सरकारला सद्बुद्धी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:42 PM2018-09-19T22:42:33+5:302018-09-19T22:42:49+5:30

भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.

Give the government good sense | सरकारला सद्बुद्धी द्यावी

सरकारला सद्बुद्धी द्यावी

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेना : गणरायाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.
नोटबंदीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडची दरवाढ, बेरोजगारी, शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, जनतेच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करणे, बँक घोटाळे अशा अनेक बाबींसाठी सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला. गणपतीच्या विसर्जनापूर्वी या सरकारला सद्बुद्धी द्यावी, त्यामुळे जनतेचे कल्याण होईल, अशी मागणी या यज्ञाद्वारे करण्यात आली.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, शहरअध्यक्ष मनदीप रोडे, सचिव भरत गुप्ता, वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा उपाध्यक्ष महिला सेना माया मेश्राम, शहर अध्यक्ष महिला सेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे, तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर, शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करण नायर, शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर, चैतन्य सदाफळे आदी उपस्थित होते.

Web Title: Give the government good sense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.