आपुलकीच्या भावनेतून सामान्य नागरिकांना शासकीय सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 01:10 AM2016-07-26T01:10:57+5:302016-07-26T01:10:57+5:30

पोंभुर्णा येथे बांधण्यात आलेली पंचायत समितीची इमारत देखणी आहे. या इमारतीसाठी लागणारे...

Give government services to ordinary citizens in the spirit of affection | आपुलकीच्या भावनेतून सामान्य नागरिकांना शासकीय सुविधा द्या

आपुलकीच्या भावनेतून सामान्य नागरिकांना शासकीय सुविधा द्या

Next

सुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा तालुक्याला विकासात अग्रेसर करू
चंद्रपूर : पोंभुर्णा येथे बांधण्यात आलेली पंचायत समितीची इमारत देखणी आहे. या इमारतीसाठी लागणारे आवश्यक साहित्यही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. परंतु या देखण्या इमारतीत सर्व सामान्यांना शासकीय सुविधेचा लाभ तत्परतेने आणि आपुलकीच्या भावनेने मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
पोंभुर्णा येथे ९२ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या नवीन पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्याच्या हस्ते केल्यावर ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेलसिंह चंदेल, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, सदस्या अल्का आत्राम, पंचायत समिती सभापती बाबुपाटील चिंचोळकर, नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, पंचायत समिती सदस्या संगिता घोगंडे, भारती कन्नाके, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे आदी उपस्थित होते.
सरकार सामान्य माणसाच्या सेवेसाठी काम करते. सामान्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ही इमारत बांधण्यात आली आहे. येथे चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी येथे काम करणा-यांची आहे. पोंभुर्णा तालुका विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी अनेक कामे केली जात आहे. लवकरच तालुक्यातील सर्व शाळा ई-लर्निग केल्या जाणार असून अंगणवाडयामध्येही अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जातील. मुलांवर लहान वयात चांगले संस्कार व बौध्दिक ज्ञान देण्याचा यातून प्रयत्न केला जात आहे.
तालुक्यातील सिंचनाच्या सुविधावर लक्ष दिले जात आहे. सर्व मालगुजारी तलावांचे नूतनीकरण व खोलीकरण केले जाईल. पोंभुर्णा मागास तालुका म्हणून असलेली ओळख लवकरच पुसून काढेल. विकासाचा तालुका म्हणून पोंभुणार्ची ओळख निर्माण होईल. येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून हे रुग्णालय राज्यातील सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक रुग्णालय बनवू. दोन वर्षांत रुग्णालयाची देखणी इमारत उभी राहील.
पोंभुर्णा तालुक्यात ज्या ग्राम पंचायतींना स्वत:ची इमारत नाही, अशा सर्व ग्राम पंचायतींना लवकरच स्वत:च्या हक्काच्या इमारती उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. पंचायत समितीत मॉड्यूलर फर्निचर बनविले जाणार असून यासाठी १ कोटी ७८ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. असे फर्निचर असलेली पोंभूर्णा ही राज्यातील प्रमुख पंचायत समिती राहणार आहे.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रास्ताविक केले. याच कार्यक्रमात पालकमंत्र्याच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वृंदा चिलनकर व माया शेंडे या महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give government services to ordinary citizens in the spirit of affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.