शेतकºयांना सिंचनाकरिता पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:30 AM2017-09-10T00:30:41+5:302017-09-10T00:30:54+5:30
हरणघाट उपसा सिंचन योजनेमधून शेतकºयांना पाणी दिले जात होत; मात्र या पाण्याचा पुरवठा पंधरा दिवसांपासून बंद केल्याने मूल परिसरातील शेतकºयासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हरणघाट उपसा सिंचन योजनेमधून शेतकºयांना पाणी दिले जात होत; मात्र या पाण्याचा पुरवठा पंधरा दिवसांपासून बंद केल्याने मूल परिसरातील शेतकºयासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हरणघाट उपसा सिंचन योजनेशी संबधित अधिकाºयांची नुकतीच बैठक घेतली. हरणघाट उपसा सिंचन
योजनविषयी निर्माण झालेल्या समस्या निकाली कशा काढता येईल, या विषयी काय उपाययोजना करता येईल, याविषयी चर्चा करुन, हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकºयांच्या शिवारात त्वरीत उपलब्ध करुन देण्याविषयी संबधीत यत्रंणेला आदेश दिले.
हरणघाट उपसा सिंचन योजना मागील पंधरा दिवसांपासून बंद असुन, या योजनेचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे , शेतकºयांना वेळेत पाणी देणे कठीण झाले होते. यामुळे मुल परिसरातील धाण पीक पुर्णत: धोक्यात आले होते. जि.प. अध्यक्ष यांच्या दालनात पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता र.वा. पाटील, सहाय्यक अभियंता ए.बी .देशट्टीवार, उपसा सिंचन उपविभाग चंद्रपुरच्या उपकार्यकारी अभियंता विद्युत भरकाटे व मूल परिसरातील ग्रामस्थ यांच्या समक्ष बैठक घेवून उपसासिंचन योजनेचा विद्युत पुरवठा नियमित कसा करता येईल, याबाबत संबंधीत यंत्रणेने कायम स्वरुपी उपाय योजना करावी.शिवाय गोसिखुर्द धरणाचे येणारे पाणी नहरद्वारा आसोलामेंढा तलावाच्या नहरात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीला प्रभाकर भोयर, संजय येणूरकर, प्रविण येणूरकर, उमाजी निकुरे, अशोक लेनेगुरे, उल्हास अंबाटकर, नामदेव ढोके कावडे बैठकीला उपस्थित होते.