शिक्षक मतदारसंघात प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:37+5:302020-12-15T04:43:37+5:30
चंद्रपूर : शिक्षक मतदारसंघात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदार करण्याचा अधिकार द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ...
चंद्रपूर : शिक्षक मतदारसंघात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदार करण्याचा अधिकार द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबविणार आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आल्याची माहिती सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक )च्या राज्यकार्यकारीणी सभा नुकतीच पार पडली. सभेला राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्यवाह सुधाकर म्हस्के, कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, उपाध्यक्ष डॉ.सतपाल सोवळे, प्रकाश चतरकर, अविनाश तालापल्लीवार, संघटनमंत्री सुरेश दंडवते, सहकार्यवाह प्रकाश चुनारकर, पुरूषोत्तम काळे, सहसंपर्कप्रमुख दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
या सभेत अनेक ठराव झाले असून शिक्षक मतदारसंघात प्राथमिक शिक्षकांना मतदार करण्याचा एकमुखाने ठराव पारित करण्यात आला.
प्राथमिक शिक्षकांना मतदार होण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमात दुरूस्ती होणे आवश्यक असल्याचे राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकसुद्धा परिषदेच्या वतीने आयोजित स्वाक्षरी मोहीमेत सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधणार आहे.