पोलीस भरतीत ओबीसींना आरक्षण द्या
By admin | Published: January 8, 2015 10:53 PM2015-01-08T22:53:39+5:302015-01-08T22:53:39+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नव्हती. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नव्हती. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्यात याव्या, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष शशीकांत देशकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस निमेश मानकर, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, विधानसभा उपाध्यक्ष सुनील काळे, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष बब्बुभाई इसा, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेशसचिव अमित उमरे, शहर महासचिव महेंद्र लोखंडे, संजय तुरीले, संजय अडबाले तसेच पीडित ओबीसी तरुणांची उपस्थिती होती.
मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील पोलीस भरतीत ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा जिल्हा प्रशासनातर्फे आरक्षित करण्यात आलेली नव्हती. परंतु इतर वर्धा, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्यात आलेल्या होत्या.
मागील वर्षी या संदर्भात शशीकांत देशकर यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री संजय देवतळे यांना निवेदन दिलेले होते. चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसीला घटनेनुसार १९ टक्के आरक्षण देण्यात आलेले होते. ते कालांतराने ११ टक्के करण्यात आले. परंतु मागील तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित केलेली नसल्यामुळे येथील बेरोजगार ओबीसी तरुणांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध असंतोष पसरलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)