नायब तहसीलदार पदाच्या परीक्षेत तलाठ्यांना आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:25+5:302021-08-18T04:33:25+5:30
तलाठ्यांच्या मार्फतीने आजपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कामे व शासनाच्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या आहेत. तलाठीवर्गाकडून अशा स्वरूपाची अनेक उल्लेखनीय कामे ...
तलाठ्यांच्या मार्फतीने आजपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कामे व शासनाच्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या आहेत. तलाठीवर्गाकडून अशा स्वरूपाची अनेक उल्लेखनीय कामे झालेली आहेत. काळानुरूप तलाठी पदाच्या शैक्षणिक पात्रतेतसुध्दा वेळोवेळी बदल होऊन ती सध्या पदवीपर्यंत गेली आहे. अनेक तलाठ्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याने ते एम. पी. एस. सी.ची तयारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमतेला चालना मिळावी. अधिकारी बनून शासनाच्या विकासकामात हातभार लागावा, या उद्देशाने तलाठी संवर्गासाठी किमान तीस टक्के राखीव जागा नायब तहसीलदार पदासाठी असाव्यात. ज्याप्रमाणे पोलीस विभागात चार ते सहा वर्षे सेवा करणाऱ्या पोलीस शिपाई, हवालदार यांना खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा देण्यासाठी राखीव असातात. त्याचप्रमाणे महसूल विभागातील नायब तहसीलदार पदासाठी तलाठी संवर्गाकरिता जागा राखीव ठेवाव्यात, असे निवेदन चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले दिले. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, सचिव अमोल घाटे, वैभव कार्लेकर, आकाश तुतारे, सचिन डाहुले, विलास निखाडे, चंदन करमरकर व विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
170821\img-20210815-wa0276.jpg
आमदार बंटी भांगडीया यांना निवेदन देताना विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी