पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तत्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:35+5:302021-05-11T04:29:35+5:30
जिल्ह्यात लससाठा उपलब्ध नसल्याने अनेकदा तासंतास वाट बघत हजारो लोक लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे राहत असतात. हे लसीकरण केंद्र ...
जिल्ह्यात लससाठा उपलब्ध नसल्याने अनेकदा तासंतास वाट बघत हजारो लोक लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे राहत असतात. हे लसीकरण केंद्र जणू कोरोना विषाणूच्या प्रसार होणारे केंद्र आहे की काय असा प्रश्न अनेकदा निर्माण होत आहे. तासनतास उभे राहूनही लस उपलब्ध होत नसल्याने निराशा होऊन घरी परत जावे लागत आहे. परंतु, त्यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना ४५ दिवस लोटूनसुद्धा दुसरा डोस मिळत नसल्याने मोठा प्रश्न पडला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला खूप उशीर होत असल्याने जिल्ह्यातील इतर लसीकरण केंद्राचा आधार अनेक नागरिक घेत आहे. मात्र, सामान्य माणूस द्विधावस्थेत पडला आहे. त्यामुळे त्वरित हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता तत्काळ दुसऱ्या डोस घेण्याकरिता स्वतंत्र केंद्र उभारण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केली आहे.