शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:17 AM2017-10-18T00:17:58+5:302017-10-18T00:18:09+5:30
चिमुर तालुक्याचे विभाजन करून शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या, अशा मागणीचे निवेदन शंकरपूर संघर्ष समितीच्या वतीने आ. कीर्तीकुमार भांगडीया यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : चिमुर तालुक्याचे विभाजन करून शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या, अशा मागणीचे निवेदन शंकरपूर संघर्ष समितीच्या वतीने आ. कीर्तीकुमार भांगडीया यांना देण्यात आले.
चिमुर तालुक्यातील भिसीला अतिरीक्त तालुक्याचा दर्जा देण्यात आला आहे. या तालुका कार्यालयाशी शंकरपूर तलाठी साजातील गावे जोडण्यात आली आहेत़ परंतु, दळणवळण आणि इतर गैरसोयीमुळे शंकरपूर तलाठी साजातील गावातील नागरिकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या साजातील गावे चिमूर तालूक्याशी निगडीत ठेवावी़ शिवाय विकासाचा अनुशेष पूर्ण करावा आणि मूललभूत सुविधांसाठी मूबलक निधी द्यावा, अशी मागणी आ. भांगडिया शंकरपूर येथे आले असता संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना शंकरपूर येथे पोलीस ठाण्याची निर्मितीसाठी शासनाने पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार भांगडिया यांनी शिष्टमंडळला दिली़
या शिष्टमंडळात प्रा.विजय टिपले, अमोद गौरकर, युवराज भुरस्कर, इम्तीयाज शेख, आगू हजारे, कुणाल कांबळे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.