उज्ज्वल भविष्यासाठी वाचनाला वेळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:05 AM2017-11-30T00:05:20+5:302017-11-30T00:05:44+5:30
उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन ही गुंतवणूक आहे. त्यामुळे वाचनाला वेळ द्या, असा सल्ला उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ यांनी दिला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन ही गुंतवणूक आहे. त्यामुळे वाचनाला वेळ द्या, असा सल्ला उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ यांनी दिला.
गेल्या दोन दिवसांपासून साहित्य, कला, संस्कृती आणि वाचन चळवळीला उजागर करणाºया ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनील बोरगमवार, जिल्हा ग्रंथपाल आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.
ग्रंथोत्सवादरम्यान झालेल्या परिसंवादामध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सिटी कन्या विद्यालयाची मानसी विश्वकर्मा प्रथम तर ज्युबली हायस्कूलची जेबा सेल्वीम व्दितीय ठरली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अभ्यास करुन वेगवेगळया शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या २३ स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. संचालन प्रशांत आर्वे यांनी केले.