मागणीेनुसार निधी मिळेलच नागरिकांना पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:55 PM2019-05-20T22:55:55+5:302019-05-20T22:56:37+5:30
जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक आहे. तिथे आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध केल्या जाईल. यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ मागणी करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईची झळ बसू नये. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईचा युद्ध पातळीवर सामना करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक आहे. तिथे आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध केल्या जाईल. यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ मागणी करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईची झळ बसू नये. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईचा युद्ध पातळीवर सामना करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त संजय काकडे व सर्व नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात उन्हाळाभर पुरेल एवढी पाण्याची उपलब्धता आहे. मात्र दुर्लक्ष किंवा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवता कामा नये. उपाययोजनेचे अचूक नियोजन करावे. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाºयांनी वर्तमानपत्रांमध्ये पाणी टंचाईसंदर्भात येणाºया बातम्यांकडे लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी गरज भासत आहे. त्याठिकाणी तातडीची उपाययोजना करावी. यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दिली. पाणीसंवर्धन करण्याच्या दृष्टीने जनजागृतीचे काम प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी प्राधान्याने करावे असे सांगत पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरता येईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई व उपाययोजनेबाबत माहिती सादर केली.
पालकमंत्र्यांकडून ‘लोकमत’ची दखल
जिल्ह्यातील पाणीटंचाई समस्येवर ‘लोकमत’ ने विशेष पान प्रकाशित केले होते. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यातील वृत्ताची दखल घेऊन पाणी टंचाईच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्यास प्रशासनाने गांभीर्याने घेऊन बातम्यांवरून तातडीची उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.हलगर्जीपणा करणारे अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात.
मनपाने टोल फ्री क्रमांक द्यावा
मनपाने पाणीटंचाई संदर्भात नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा. ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत विशिष्ट दूरध्वनी क्रमांक तयार करून प्राप्त तक्रारींचे निराकरण यंत्रणेमार्फ त करावे. महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात यावी. आवश्यकता असणाºया वॉर्डात हातपंप खोदण्याचा निर्णय या समितीच्या बैठकीत घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.