बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:34+5:302021-05-01T04:27:34+5:30

वरोरा : येथे बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. कोळसा खाणीमध्ये ...

Give work to the hands of the unemployed | बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे

बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे

Next

वरोरा : येथे बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. कोळसा खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात. मात्र त्यांच्या पाल्यांना काम नसल्याने नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहे. शासनाने विविध योजना राबवून काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

सुसज्ज बाजार ओट्यांची निर्मिती

कोरपना : शहरातील आठवडी बाजार परिसरात नवीन सुसज्ज बाजार ओट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांना चांगली सोय निर्माण झाली आहे. तसेच बाजार करणे सुविधाजनक झाले आहे. नवीन ओट्यावर छत उभारण्यात आले असल्याने पाऊस व उन्हापासून बचाव होत असल्याची प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करीत आहेत. तसेच पावसाळ्यातील चिखलाचा त्रास कमी होणार आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

भद्रावती : दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अनेकजण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने शहरातील काही भागामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कवटाळा-साखरी मार्गाची दुरवस्था

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील कवटाळा - राजुरा मार्गाचे अनेक दिवसापासून काम सुरू आहे. त्यामुळे कवटाळा ते साखरीपर्यंतच्या रस्त्यावर गिट्टी पसरविली असल्याने दुचाकी वाहकांना ये - जा कठीण झाले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सदर मार्गाच्या रत्याचे बांधकाम विभागाने लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात

सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देत नसल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, काही ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे आहे.

मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त

राजुरा : सध्या कापसाची वेचणी सुरू आहे. मात्र कापूस वेचणीसाठी मजूरच मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पहाडावरील मजुरांची मनधरणी केली जात आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कापसाला पाहिजे तसा भाव नसतानाही वेचणीसाठी मजुरांना दहा रुपये दर द्यावा लागत आहे. त्यामुळे नवे तंत्रज्ञान विकसित करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

फांद्यांनी झाकले पथदिवे

सावली : सावली तालुक्यातील निमगावनी परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्या, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

महामार्गावरील विद्युत खांब हटविण्याची मागणी

नागभीड : नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्षाच्यावर कालावधी होत असला तरी विद्युत पोल मात्र अद्याप महामार्गावरच आहेत. पोल रस्त्यावरच असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उल्लेखनीय बाब ही की, येथील जुना बसस्थानक ते टी पाॅईंट चौक या वर्दळीच्या ठिकाणीच हे विद्युत खांब उभे आहेत. नागभीड-आरमोरी हा पूर्वी राज्य महामार्ग होता. हा राज्यमार्ग रुंदीने लहान होता. विद्युत वितरण कंपनीनेही राज्य महामार्गाच्या नियमानुसार अंतर राखून विद्युत पोल लावले होते. मात्र आता या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढल्यामुळे हे विद्युत खांब आता रस्त्यावर आले आहेत. उमरेड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गातील नागभीड, आरमोरी या टप्प्याचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर हे पोल हटविण्यात येतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र हे पोल आताही तसेच आहेत. विशेष म्हणजे नागभीड नगर परिषदेतच समाविष्ट असलेल्या सुलेझरीपासून समोर ब्रम्हपुरीकडे जाणाऱ्या याच राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत खांब हटवून ते सुरक्षित अंतरावर लावण्यात आले आहेत. मात्र ऐन वर्दळीच्या असलेल्या येथील जुना बसस्थानक ते टी पाॅईंट चौकापर्यंत जे खांब लावण्यात आले आहे ते अद्यापही जेसे थे आहेत. रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे एखादेवेळेस अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरील खांब हटविण्याची मागणी होत आहे.

सिंदेवाही तालुक्यात स्वच्छतेचा अभाव

सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांनी हागणदारी मुक्तीचे पारितोषिक पटकावले आहे. परंतु, त्या गावाकडे दृष्टी टाकल्यास प्रत्यक्षात गाव स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. राज्यात गाव स्वच्छता मोहिमेतंर्गत अनेक गावे हागणदारीमुक्त करून पारितोषिक बहाल करण्यात आले. हागणदारीमुक्त झालेल्या गावात प्रत्यक्ष फेरफटका मारला असता स्वच्छ भारत मोहिमेकडे दुर्लक्ष होऊन हागणदारीमुक्त मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

गडचांदूर-कोरपना रस्त्याची दुरुस्ती करा

कोरपना : कोरपना ते गडचांदूर या मार्गाची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गडचांदूर येथे सिमेंट कंपन्या असल्यामुळे या मार्गावर नेहमीच जड वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याचे सिमेंटीकरण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्यावर खड्डे असल्यामुळे अनेकवेळा अपघातही झाले आहे.

रानडुकरांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त

कोरपना : कोरपना व परिसरातील शिवारात मोठ्या प्रमाणात रानडुकरे तसेच इतर वन्यप्राणी शेतात हैदोस घालत आहेत. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. जंगलातील रानडुकरे शेतात येत असल्याने शेतात असलेल्या उभ्या पिकांची नासाडी करीत आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यावरही फिरत असल्याने अपघातही होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कोरपना, कन्हाळगाव, चन्नई, मांडवा, हातलोणी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. रानडुकरे शेतजमीन उकरून ठेवत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी

राजुरा : तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार वाम मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरभरती बंदी असल्याने बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. लाॅकडाऊननंतर अनेकांनी गाव गाठला आहे.

रस्त्यावरील पार्किंमुळे नागरिक त्रस्त

मूल : येथील गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जात आहेत. तसेच या रोडचे नव्याने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहने तसेच पांथस्थांना मार्गक्रमण करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.

Web Title: Give work to the hands of the unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.