मनरेगा अंतर्गत चेकबरांज येथील मजुरांना काम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:59+5:302021-06-11T04:19:59+5:30
भद्रावती : तालुक्यातील चेकबरांज येथील मजुरांना मनरेगा अंतर्गत कामे द्यावी, अशी मागणी उपसरपंच राजू डोंगे यांनी केली आहे. चेकबरांज ...
भद्रावती : तालुक्यातील चेकबरांज येथील मजुरांना मनरेगा अंतर्गत कामे द्यावी, अशी मागणी उपसरपंच राजू डोंगे यांनी केली आहे.
चेकबरांज ग्रामपंचायत हद्दीमध्ये वनविगाभाच्या रोपवाटिकेचे काम सुरू असून सदर रोपवाटिकेच्या कामासाठी मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत चेकबरांज येथील मासिक सभेमध्ये ठराव क्र. ६ नुसार मंजुरी देण्यात आली. परंतु सदर कामाकरिता चेकबरांज येथील मजुरांना कामावर न लावता वनविभागाने इतर ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांना कामावर लावले आहे, चेकबरांज येथील मंजूर काम करण्यासाठी तयार असूनसुद्धा त्यांना काम उपलब्ध करून देण्यात आले नाही. रोपवाटिकेमधील कामावर इतर ग्रामपंचायत क्षेत्रातील कामगार न लावता चेकबरांज येथील मनरेगा अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चेकबरांज ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू डोंगे यांनी तहसीलदार महेश शितोडे यांना निवेदनातून केली आहे.