कृषी महोत्सवात प्रगत शेतीची झलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:59 PM2018-01-16T23:59:05+5:302018-01-16T23:59:30+5:30
२१ व्या शतकातही शेतकरी जुन्या पद्धतीने शेती करीत आहे. त्यामुळे शेती परवडत नसल्याची ओरड अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : २१ व्या शतकातही शेतकरी जुन्या पद्धतीने शेती करीत आहे. त्यामुळे शेती परवडत नसल्याची ओरड अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित कृषी महोत्सवात सादर केलेल्या तंत्रज्ञानातून प्रगत शेतीची झलक दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास प्रगती साधू शकतो, असा आशावाद व्यक्त होत आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सव, सेंद्रीय शेतमाल विक्री, महिला बचत गट मेळावा (सरस) व मार्गदर्शन सत्रांचा महोत्सवाला सोमवारपासून सुरु झाली आहे. यामध्ये ज्ञान, विज्ञान, शेती, तंत्रज्ञान आणि बचत गटांनी आपल्या कलागुणातून साकारलेल्या स्टॉलची विक्री या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सेंद्रिय शेती, तुरीचे उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीसोबत करण्यात येणाऱ्या जोडधंद्याबाबत माहिती, मधमाशा पालन माहिती, कपाशीवरील किड व रोगाचे एकीकृत व्यवस्थापन, आदर्शगाव योजनेची माहिती, शेततळयात मत्स्यसवंर्धनासाठी प्रोत्साहन, भाजीपाला पिके याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यासोबतच चांदा क्लबवर चार प्रदर्शनी मंडप उभारण्यात आले आहे. यामध्ये माहिती व उपक्रम, बचत गटांचे विक्री स्टॉल, पशुसंवर्धन विभागाचे गुरांच्या संवर्धन, खाद्यांन्न स्टॉल व मान्यवरांच्या भाषणासाठी मंडपाचे दोन स्वतंत्र कक्ष आहेत. प्रदर्शनी मंडपामध्ये कृषि तंत्रज्ञान व्यसस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा कृषी अधिक्षक व कृषी व कृषीच्या संदर्भातील अन्य विभागाची माहिती स्टॉलद्वारे तसेच लावलेल्या फलकाद्वारे नागरिकांना देण्यात येत आहे.
अत्यल्प खर्चात कुक्कुटपालन व शेळीपालन व्यवसाय
दिवसेंदिवस कोंबडीच्या व शेळीच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून कुकुडपालन व शेळीपालन व्यवसाय कमी खर्चात व कमी जागेत सदर व्यवसाय करण्याचे प्रात्यक्षिक तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकात्सालय मूलने सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी कडकनाथ कोंबडी, गिरीराज कोंबडी, आयआर कोंबडी आदीचे उत्पादन घेण्यासंदर्भात तयार करण्यात येणारे शेड बांबूच्या साह्याने तयार करुन त्यावर जाळी लाऊन कुकुटपालन करता येते. त्यामुळे आपण कमी खर्चात हा व्यवसाय योग्यप्रकारे करुन शकतो.
खतनिर्मितीचा प्रकल्प
शेतकरी शेतीसाठी विविध प्रकारचे खत बाजारातून महागळया दरात खरेदी करुन त्याचा वापर करत असतात. मात्र महोत्सवात प्रकल्प संचालक आत्माने स्वत:च्याच घरी खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. त्यामध्ये गोमूत्र, जनावरचे शेण यांच्यापासून कंपोस्ट खत, सीपीपी कंपोस्ट खत, द्रव्यरुपी खते, घनरुपी खत, हिरव्या स्वरुपातील खत तयार करण्याची प्रयोग सादर केला आहे.
पहाडावर शेती करण्याचे तंत्र
पहाडावर शेती करण्यास अडचण जात असते अशी ओरड अनेक शेतकºयांची असते. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूरने विकसीत पाणलोट या प्रकल्पातून शेतकऱ्याची ही संकल्पना दूर केली आहे. पावसाळ्यात आलेले पाणी वाहून जात असते. मात्र पहाडावार सिंमेट बंधारे बाधून पाणी अडवून त्याठिकाणी शेती करता येते. त्यामध्ये पहाडावर अनेक फुलझाडांची शेती तर उतारावर धानाची शेती करता येते.
आजचे कार्यक्रम
११ वाजता शेती कमी खर्चाचे तंत्रज्ञान, १२.३० वाजता कापूस शेती व्यवस्थापन, २.३० वाजता हळद उत्पादन, ४ वाजता सेडनेटमधील भाजीपाला उत्पादन व फायदे यावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर हॉल क्रमांक २ मध्ये डॉ.प्रशांत तेलवेकर मत्स्यपालन व व्यवसाय संधी यावर मार्गदर्शन, १२ वाजता डॉ.सचिन बेलसरे कोळंबी उत्पादन व व्यवस्था संधी त्यानंतर जिल्हा रेशीम अधिकारी बि.व्ही.आवाड यांचे रेशीम उत्पादनावर मार्गदर्शन, सायंकाळी ४ वाजता डॉ.निलेश खलाटे यांचे बंदीस्त शेळीपालन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.