चिमुकल्यांनी घडविले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
By admin | Published: January 18, 2015 11:20 PM2015-01-18T23:20:37+5:302015-01-18T23:20:37+5:30
श्री गुरुदेव सेवा मंडळ, संत नगाजी महाराज सेवा मंडळाच्यावतीने नुकतीच नांदा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त महोत्सव साजरा करण्यात आला.
नांदाफाटा : श्री गुरुदेव सेवा मंडळ, संत नगाजी महाराज सेवा मंडळाच्यावतीने नुकतीच नांदा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये ह.भ.प. अनंत महाराज कुंभा, ह.भ.प. किन्नाके महाराज, ह.भ.प. विठ्ठल डाखरे महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. पहाटे प्रभातफेरी काढण्यात आली.
यामध्ये गावातील श्री प्रभू रामचंद्र विद्यालय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध वेशभुषेतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. याचबरोबर महिलांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा करून महिला जागृतीचे आणि एकात्मतेचा संदेश दिला.
याचबरोबर महिलांनी महाराष्ट्रीय वेशभूषा करून महिला जागृती आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश यावेळी दिला. महोत्सवानिमित्त गावात ग्रामस्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर उत्कृष्ट रांगोळ्यासाठी महिलांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाच्या विविध सत्रात व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता बेरोजगारी, अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर विचारमंथन करण्यात आले. यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. देवराव जोगी, उपसरपंच बंडू वरारकर, पूजा मडावी, मारोती जमदाडे, भास्कर लोहबडे, दिवाकर उपरे, सुर्यभान अतकारे, भालचंद्र चौधरी, पुरुषोत्तम निब्रड, प्राचार्य अनिल मुसळे, माजी सरपंच श्यामसुंदर राऊत आदींनी परिश्रम घेतले. संचालन नितेश मालेकर यांनी तर आभार सतीश जमदाडे यांनी मानले.