जी.एम.आर. कंपनीतील कामगारांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:08 PM2018-11-28T22:08:50+5:302018-11-28T22:09:06+5:30

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व प्लांट व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी वरोरा येथील जी.एम.आर.पॉवर कामगार संघटनेच्या वतीने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

G.M.R. Workers' agitation of workers of the Company | जी.एम.आर. कंपनीतील कामगारांचे अन्नत्याग आंदोलन

जी.एम.आर. कंपनीतील कामगारांचे अन्नत्याग आंदोलन

Next
ठळक मुद्देकंपनीकडून कामगारांवर अन्याय झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व प्लांट व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी वरोरा येथील जी.एम.आर.पॉवर कामगार संघटनेच्या वतीने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सदर कामगार जी.एम. आर. पॉवर प्लांट वरोरा येथे ५ ते ७ वर्षापासून काम करीत आहेत. सदर कारखान्यात कामगारांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविल्या जात नाही. २२ नोव्हेंबर २०१६ ला कंपनीकडे कुशल व अकुशल कामगारांची पगारवाढ, वेतनाची पावती देण्यात यावी, संरक्षणासाठी रेनकोट देण्यात यावे, कामगारांचे पी.एफ. कापण्यात यावे, कामागरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा पॉलिसी काढण्यात यावी, मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात यावी. बससेवा देण्यात यावी, कंपनी कायदा १९४८ अंतर्गत सेक्शन ११,१८ १९, ४०, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ७९, ८०, ८१, ८४ या कायद्याची अंमलबजाणी करण्यात यावी, कामगारांना बोनस देण्यात यावे इत्यादी २३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.
जी.एम.आर. पॉवर कंपनीने कामगारांना न्याय न देता उलट कामगारांना कमी करण्यात आले. नंतर अनेकदा कामगारांना कंपनीत सामावून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, कामगाार मंत्री, सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे व्यवस्थापन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारपासून कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्या नेतृत्वात वैभव सुदाम वानखेडे, प्रमोद पुंडलिक क्षीरसागर, विजय रामभाऊ पारोधी, पंकज नानाजी पडोली, परशुराम विठ्ठल घाटे या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसचे महेश मेंढे, रोशन पचारे, विनोद अहीरकर, नागेश बोंडे, पवन अगदारी, मनोज आमटे, सुरेश वाटोडे, प्रमानंद जोगी, रमेश बुच्चे, संतोष बांदूरकर हे आंदोलनादरम्यान उपस्थित होते.

Web Title: G.M.R. Workers' agitation of workers of the Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.