शिक्षणासह ध्येय निश्चितीची गरज
By Admin | Published: February 10, 2017 12:49 AM2017-02-10T00:49:56+5:302017-02-10T00:49:56+5:30
निसर्गाने प्रत्येकाला एक सुप्तगुण दिला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते.
सोनाली कुलकर्णी : बीआयटीतील ‘आॅरा’ कार्यक्रमाचा समारोप
चंद्रपूर : निसर्गाने प्रत्येकाला एक सुप्तगुण दिला आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते. त्या कलेला व सुप्तगुणाला वाव मिळाला तर व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली होत असते. अनेकदा त्या व्यक्तीतील ते गुण मनुष्याला यशोशिखरावर नेऊन ठेवतात. त्यासाठी शिक्षणासह ध्येय निश्चितीची गरज असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.
बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘आॅरा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी संस्थाध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य डॉ. बसवराज, प्रा. परमार, प्रा. सत्यनारायण, प्रा. गुप्ता, प्रा. जयश्री गावंडे, प्रा. रजनीकांत गुप्ता, प्रा. मनीष तिवारी, प्रा. अमृता बल्लाळ, आॅराचे अध्यक्ष रोहित आंबोरकर यांची उपस्थिती होती. यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तूत झाले. यावेळी मिस बीआयटी म्हणून चैतन्या मेश्राम तर मिस्टर बीआयटी म्हणून शैलेश खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. विपीन गुल्हाने, प्रा. विशाल पिंपळकर, प्रमोद खरेबियन, अविनाश वासाडे, प्रणय बोगर, गोपाल यादव, अक्षय झाडे, शफाकत अली, रोहिणी डांगे, अक्षय डुकरे, संकेत पिदूरकर, सौरभ घोंगे, सना काझी, गजानन अडवे, प्रसाद सोनेकर, निखीलेश डवळे, कांबळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)