भगवान पाटलांची वकिली मानवी मूल्ये जपणारी!
By admin | Published: March 3, 2017 12:55 AM2017-03-03T00:55:57+5:302017-03-03T00:55:57+5:30
षष्टयाब्दी निमित्त ज्येष्ठ नागरिक संघाने अॅड. भगवान पाटील यांचा नागरी सत्कार केला. यावेळी नामवंताची उपस्थिती
प्रतिष्ठित व नामवंतांचा सहभाग : षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त नागरी सत्कार
चंद्रपूर: षष्टयाब्दी निमित्त ज्येष्ठ नागरिक संघाने अॅड. भगवान पाटील यांचा नागरी सत्कार केला. यावेळी नामवंताची उपस्थिती सोहळ्याची उंची वाढविणारी होती. अॅड. भगवान पाटील यांनी पैशासाठी वकिली केली नसून ती मानवी मूल्यांची जोपासना करणारी असल्याच्या भावना यावेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केल्या.
या सोहळ्याचे उद्घाटन आ. नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. के. आरीकर होते. प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कारमूर्ती अॅड. भगवान पाटील व त्यांच्या पत्नी विजया पाटील यांना मानपत्र, शाल व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. या निमीत्त षट्यब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोलताना आ. नाना शामकुळे व केंद्रीय मंत्री ना. अहीर यांनी अॅड. पाटील यांच्याबद्दल बोलताना विविध क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केल्याचे सांगितले.
अॅड. पाटील यांनी काही मूल्य प्रमाण मानले. त्यांनी पैशासाठी वकिली केली नाही. अॅड. पाटील यांचे नंदूरबार येथून लहान बंधू डॉ. मोहन पाटील यांच्या भाषणाने नवचैतन्य निर्माण झाले. कार्यक्रमाला नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण पाटील, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अॅड. हिराचंद बोरकुटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सचिव केशवराव जेणेकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पी. सी. खजांची, जिल्हा बार असो. अध्यक्ष अॅड. रमेश टिपले, माजी अध्यक्ष अॅड. विजय मोगरे, माजी अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते, माजी अध्यक्ष अॅड. मुकुंद टंडन, अॅड. प्रकाश सपाटे, विचारवंत एल. के. मडावी, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र वैद्य, गोसीखुर्द धरण संघर्षाचे नेते अॅड. गोविंद भेंडारकर आदी उपस्थित होते.
सत्कार सोहळा समितीचे सचिव राजू हनमंते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन प्रा. डॉ. सुनिता भगत, सन्मानपत्राचे वाचन प्राचार्या विद्या बांगडे यांनी केले. (प्रतिनिधी)