चंद्रपुरात हे चाललंय काय? जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह दोन मुलांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 08:58 PM2021-09-01T20:58:17+5:302021-09-01T20:59:54+5:30

Chandrapur News जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे आठ जणांना भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाणीची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नागभीड तालुक्यात मिंडाळा या गावात घटनेची पुनरावृत्ती झाली.

Is this going on in Chandrapur? Two children, including an elderly woman, were beaten up on suspicion of witchcraft | चंद्रपुरात हे चाललंय काय? जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह दोन मुलांना जबर मारहाण

चंद्रपुरात हे चाललंय काय? जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह दोन मुलांना जबर मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देजिवतीच्या प्रकरणाची चंद्रपूर जिल्ह्यातच पुनरावृत्ती पाच जणांना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे आठ जणांना भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाणीची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नागभीड तालुक्यात मिंडाळा या गावात घटनेची पुनरावृत्ती झाली. जादूटोणाच्या संशयावरून वृद्ध महिलेसह तिच्या दोन मुलांना एका कुटुंबातील सदस्यांनी पाण्याच्या टाकीला दोराने बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची खळबळजनक घटना मिंडाळा बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. (Is this going on in Chandrapur? Two children, including an elderly woman, were beaten up on suspicion of witchcraft)

मिंडाळा येथील इंदिरा उपासराव कामठे (७०) हिचा मुलगा अशोक कामठे हा जादूटोणा करतो. घरातून नेहमीच जादूटोण्याद्वारे पैसे गायब करतो, असा आरोपींचा संशय होता. या संशयातूनच मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अशोकच्या आई व बहिणीला मारहाण करण्यात आली.

यावेळी अशोक नागभीड येथे होता. आरोपींनी नागभीड गाठून अशोकला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून मिंडाळाला आणले. यानंतर त्याला गावातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला दोराने बांधून जबर मारहाण केली.


या अमानुष मारहाणीने कामठे कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. मात्र, त्यांना नागभीडला येण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते, तसेच संध्याकाळ होत असल्याने त्या दिवशी तक्रार दाखल केली नाही. मात्र, बुधवारी सकाळीच अशोकच्या आईने नागभीड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. अशोक मारहाणीपासून घरी नसल्याचे समजते.

या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके सर्व रा. मिंडाळा आणि मयुरीची आई, रा. कानपा या सर्वांना १४३, १४७, १४९, ४५२, ३२४, ३४२, ३६३, ३६८, ३२३ सहकलम ३ (१), (२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट दिली आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.


सामाजिक न्याय विभाग सुस्त

चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील अमानुष घटनेची शाई वाळत नाही तोच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे अशाच प्रकारची घटना घडल्याने पुन्हा जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कायद्याबाबतची जनजागृती करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाला आहे. मात्र, हा विभाग याबाबत कुठेही जनजागृती करताना दिसत नाही. ही बाब या घटना घडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Is this going on in Chandrapur? Two children, including an elderly woman, were beaten up on suspicion of witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.