प्रवासादरम्यान ऑटोतून पळविले एक लाखांचे सोन्याचे दागिने

By परिमल डोहणे | Published: May 21, 2023 08:25 PM2023-05-21T20:25:42+5:302023-05-21T20:25:53+5:30

रामनगर पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भात तक्रार दिली.

Gold jewelery worth one lakh was stolen from the auto during the journey | प्रवासादरम्यान ऑटोतून पळविले एक लाखांचे सोन्याचे दागिने

प्रवासादरम्यान ऑटोतून पळविले एक लाखांचे सोन्याचे दागिने

googlenewsNext

चंद्रपूर : जटपुरा गेट येथून तुकूमकडे जाणाऱ्या ऑटोत बसलेल्या एका महिलेच्या बॅगमधून सलग बसलेल्या महिलेने चक्क सोन्याचे दागिने व रोकड पळविल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणाची रामनगर पोलिसात तक्रार होताच पोलिसांनी एका महिलेला अटक करून तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोकड असा एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चामोर्शी येथील सविता वाळके या आपल्या पतीसह नातेवाइकाच्या लग्नासाठी १९ मे रोजी चंद्रपुरात आल्या होत्या. चप्पल खरेदी करण्यासाठी त्या चौकात आल्या. त्यानंतर त्यांनी जटपुरा गेट येथून तुकूम जाण्यासाठी ऑटो केली. त्या ऑटोत बसताना इतरही काही महिलांनी गर्दी करून ऑटोत बसल्या. त्या अनोळखी महिला या बसस्थानकासमोर उतरल्या. दरम्यान, काही अंतर गेल्यानंतर सविता वाळके यांच्या पर्सची चैन उघडलेली दिसली. तसेच त्यातील सोन्याचे दागिने व रोकडही लंपास केली होती.

त्यांनी लगेच रामनगर पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला. तसेच बल्लारपूर बायपास मार्गाने त्या चोर महिलांचा शोध घेण्यासाठी निघाल्या. यावेळी संशयित महिला ऑटोमध्ये बसून जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ती ऑटो थांबवली. फिर्यादीने तीच महिला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी करून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई रामनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Gold jewelery worth one lakh was stolen from the auto during the journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.