चंद्रपुरातील २१ विद्यार्थ्यांना थायलंडचा गोल्डन इथिक्स पुरस्कार
By परिमल डोहणे | Published: June 30, 2023 10:57 PM2023-06-30T22:57:46+5:302023-06-30T22:58:05+5:30
९ जुलै रोजी होणार वितरण समारंभ
चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय इथिक्स क्लब थायलंड, अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि वर्ल्ड अलाइंस ऑफ बुद्धिस्ट विभागीय कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इथिक्स स्पर्धा परीक्षेमध्ये चंद्रपुरातील २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात बल्लारपूर पब्लिक स्कूल येथील कनक विनोद मून व विद्या विहार स्कूलमधील ग्रंथा वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मागील तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय इथिक्स क्लब थायलंडच्या वतीने इथिक्स स्पर्धा घेण्यात येते. यंदा पहिल्यांदाच विकास तायडे, अमित वाघमारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चंद्रपुरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंद्रपुरातील तब्बल २१ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ९ जुलै रोजी सेंट मायकल्स इंग्लिश स्कूल थायलंडचे भदंत किराती, यांच्या हस्ते सिस्टर अंजली थायलंड, मिथिला चौधरी बांग्लादेश, सभुज बरुवा, बांग्लादेश, यांच्या प्रमुख उपस्थितीत, बृजेशकुमार पझारे यांचा अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात या २१ विद्यार्थ्यांना ग्लोडन इथिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे विकास तायडे यांनी कळविले आहे.
हे आहेत विजेते
ग्रुप ‘ए’ मध्ये प्रथम ग्रंथा ए. वाघमारे, द्वितीय विनय विनोद थुल, तृतीय स्वीकृती सुभाष पुनेकर, चतुर्थ जमन्ना प्रशांत वासाडे, पाचवा देवश्री लांजेकर, सहावा खुशबू कोटांगले, सातवा तृष्णा सुनील मोनगरकर, आठवा क्रमांक अभिलाषा बगडे, नववा कृषाली सुरेंद्र चौथाले, दहावा क्रमांक हिनेश्वरी गोपाल पिपरे, तर ‘ब’ गटामध्ये प्रथम कनक विनोद मून, द्वितीय सिद्धांत थमके, तृतीय ऋतुजा नानाजी धोडरे, चतुर्थ मोनाली सतीश खांडरे, पाचवा निकीत धम्माजी मोरे, सहावा साची मेश्राम, सातवा अयंती महेश मुत्यलवार, आठवा रवी दिलीप उरकुडे, नववा तृप्ती श्रीकृष्णा बुरांडे, दहावा क्रमांक तन्वी खाडिलकर यांनी पटकावला असून यांना सन्मानित करण्यात येणार आहे.