गोंडराणी हिराईची विकासदृष्टी पे्ररणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:51 PM2018-04-06T23:51:31+5:302018-04-06T23:51:31+5:30

राणी हिराईने चंद्रपुरात देवी महाकालीचे भव्य व सुंदर मंदिर बांधले. सोबतच, महाकाली यात्रा सुरु केली. ती यात्रा आजतागायत सुरु आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व असे विविधांगी गुण राणी हिराई यांच्या ेअंगी होती.

Gondarini Hiraii's Developmental Appraisal | गोंडराणी हिराईची विकासदृष्टी पे्ररणादायी

गोंडराणी हिराईची विकासदृष्टी पे्ररणादायी

googlenewsNext
ठळक मुद्देमहाकाली यात्रेनिमित्त : धार्मिक कार्यासोबतच विकासकामांना दिली चालना

वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : राणी हिराईने चंद्रपुरात देवी महाकालीचे भव्य व सुंदर मंदिर बांधले. सोबतच, महाकाली यात्रा सुरु केली. ती यात्रा आजतागायत सुरु आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व असे विविधांगी गुण राणी हिराई यांच्या ेअंगी होती. घडाडी आणि बुद्धी चातुर्याने चंद्रपूरचा राज्यकारभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. त्यांची कारकिर्द भरीव आणि महिलांना अभिमान वाटावा अशी की राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारखाच त्यांचा गौरवाने उल्लेख व्हावा!
चंद्रपूर- बल्लारपूरचा भाग सुमारे ६०० वर्षे गोंडराजांच्या अधिपत्याखाली होता. या कालावधीत २३ राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई या एकमेव महिला शासक होत्या. त्यांची कारकिर्द केवळ १५ वर्षांची पण, या अल्पशा काळात युद्धात स्वत: उतरुन त्यांना शत्रुशी मुकाबला करावा लागला होता. राणीचे माहेर मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळचे! वडिल सरदार असल्याने राजकारण आणि युद्धाचे धडे त्यांना बालपणापासूनच मिळाले होते. त्यांचा विवाह चंद्रपुरातील बिरशहाशी झाला. वडिलाच्या निधनानंतर बिरशाह गादीवर बसला. परंतु थोड्याच दिवसानंतर एकाने विश्वासघात करुन त्यांची हत्या केली. या दाम्पत्याला वारसा नसल्याने हिराईने आपल्या नात्यातील रामशहा या सहा वर्षीय मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसविले आणि आत्मविश्वासाने राज्यकारभार बघू लागली. कान्होजी भोसले यांनी १७१० ला चंद्रपूरवर स्वारी केली. गोंड आणि पठाण सैन्य घेऊन रात्री मैदानात उतरली. तेथे कान्होजीचा पराभव झाला. यानंतर सुलतानजी निंबाळकर याने चंद्रपूरवर स्वारी केली. चंद्रपूरची आर्थिक स्थिती वाईट होती. त्यामुळे राणीने युद्ध न करता तह केला. परंतु, दुसऱ्याच वर्षी निंबाळकरला चंद्रपूर सोडून देण्याला भाग पाडले. राणीला जय-पराजयाला सामोरे जावे लागले होते. परंतु, हिंमत हरली नाही. लोककल्याणकारी कामे करून राणीने ठसा उमठविला. ऐतिहासिक रामाळा तलाव बांधले. राजाची देखणी समाधी व महाकाली मंदिर बांधले. राज्यावर औरंगजेबाचा अंमल होता. तरीही तिने गोवंश हत्याबंदी केली. रामशहा हा लहान असल्याने त्याचा मातेसारखा सांभाळ करून युद्ध व राजकारणाचे प्रशिक्षण दिले. राजा म्हणून उत्तमरित्या संस्कारीत केले. राणी हिराई धार्मिक वृत्तीची होती. माता महाकालीवर तिची प्रगाढ श्रद्धा होती.
...अन् मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण केले
राणी हिराईने चंद्रपूरला महाकाली देवीचे लहान मंदिर होते. बिरशहा हा एका युद्धात शंभूशी लढत असताना त्याचा पराभव नजिक दिसून येत होता. अशाप्रसंगी राणी हिराईने देवीची आराधना करीत पतीला युद्धात विजय मिळवून दिला. मोठे मंदिर बांधण्याचे मनाशी ठरविले. बिरशहाने युद्ध जिंकले व राणीने माता महाकालीचे मंदिर बांधले. यात्रा भरविणे सुरु केले. शेकडो वर्षांपासून ही यात्रा भरत आहे. महाकाली देवीच्या महात्म्याची प्रसिद्धी नांदेडपर्यंत पोहोचली. तेथील भािवक यात्रेदरम्यान दर्शनासाठी येऊ लागले. पोतराजे आणि भाविकांमुळे यात्रेला गर्दी उसळते. ४०-५० वर्र्षांपूर्वी मंदिराभोवतीचा बराचसा भाग मोकळा होता. त्यामुळे रात्री भरपूर जागा मिळायची. मात्र, आज घरे झाल्यामुळे यात्रेकरिता कमी जागा उरली आहे. पण यात्रेचे महत्त्व कमी झाले नाही.
राणी हिराईचा पुतळा उभारा
राणी हिराईने केलेल्या लोककल्याणकारी कार्याची दखल इतिहासाने घेतली आहे. त्यांच्या कार्यकाळातील विविध बांधकाम आजही साक्ष म्हणून उभे आहे. त्यांच्या कार्याचा म्हणावा तसा गौरव झाला नाही. त्यांच तेजस्वी इतिहास लोकांना अद्याप योग्यरित्या कळला नाही. महाकाली मंदिरात राणी हिराईचे चित्र लावण्यात आले आहे. यात्रेदरम्यान अंचलेश्वर गेटजवळ राणीचे चित्र लावले जातात. पण, हे पुरेसे नाही. चंद्रपुरात राणी हिराईचा पुतळा उभारला पाहिजे.

Web Title: Gondarini Hiraii's Developmental Appraisal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.