गोंडवनातील कवितांनी घेतला रसिकांच्या मनाचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:58 PM2018-02-11T23:58:36+5:302018-02-11T23:58:52+5:30
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवात ‘गोंडवनातील कविता’ या कविसंमेलनाने झाली. या संमेलनातील कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरद्वारे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसºया दिवसाची सुरूवात ‘गोंडवनातील कविता’ या कविसंमेलनाने झाली. या संमेलनातील कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कविवर्य ना. गो. थुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘सूर्याला दिवस जातात’ या कवितासंग्रहाचे कवी डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. धनराज खानोरकर उपस्थित होते. संचालन अविनाश पोईनकर यांनी केले.
या कविसंमेलनात आपल्या दर्जेदार कविता सादर करुन कवींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मधुकर गराटे, दीपक शिव, रेवानंद मेश्राम, राम रोगे, रंगनाथ रायपुरे, रवी धारणे, निता कोंतमवार, संगिता धोटे, सीमा पाटील, वर्षा चोबे, बी.सी. नगराळे, प्रभाकर धोपटे, प्रदीप हेमके, गुलाम मुळे, गीता रायपुरे, सुनील बावणे, विवेक पत्तीवार, विजय वाटेकर, धंनजय साळवे, स्वप्नील मेश्राम, गजानन ताजने, सुमेधा श्रीरामे, जयस्वाल, मंगेश जनबंधू, शालिक घरडे, चित्रलेखा धंदरे, नरेंद्र कन्नाके, अविनाश टिपले, महेश कोलावार, एकनाथ बुद्धे, तुलाराम चोले, लक्ष्मण पारखी आदी कवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.