गणेशोत्सवात केटरर्सवाल्यांना चांगले दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 AM2021-09-15T04:33:20+5:302021-09-15T04:33:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : करोना काळातील मागील दीड वर्षात बहुतेक सर्व व्यवहार व कार्यक्रम ठप्प पडल्यामुळे कॅटरर्स ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : करोना काळातील मागील दीड वर्षात बहुतेक सर्व व्यवहार व कार्यक्रम ठप्प पडल्यामुळे कॅटरर्स आणि मंडप डेकोरेशन हे व्यवसायिक थंडावले होते. गतवर्षी गणेशउत्सवात भोजनादी कार्यक्रम झाले नाही. यंदा मात्र गणेशोत्सवात भोजन कार्यक्रमावर जोर असून रोज घरगुती गणपती स्थापनेच्या घरी जेवणाच्या पंगती उठत असल्यामुळे त्या कामात केटरर्सवाले व्यस्त झाले आहे. त्यामुळे त्यांना चांगले दिवस असल्याचे दिसत आहे.
घरगुती गणपती दीड दिवसात पासून तर पाच वा दहा दिवस बसविले जातात. या दरम्यान त्यानिमित्त आप्तेष्ट व परिचित यांना भोजनाकरिता बोलावले जाते. त्यात ५० ते चार-पाचशे लोकांचे जेवणाच्या पंगती उठतात. याकरिता केटरर्सवरच भोजनाची व्यवस्था सोपवली जाते. मागील वर्षी प्रतिबंधात्मक नियमांमुळे जेवणाच्या पंगती उठणे यावर मर्यादा आल्या होत्या. यंदा गणेशोत्सवात बंधन सैल झाली आहेत.
किरकोळ वस्तू विक्रेत्यांना आर्थिक आधार
यंदा गणेशोत्सवात बंधन नसल्यामुळे पूजा आदी सामानाची मागणी वाढली आहे. पूजेच्या वस्तू रस्त्याच्या कडेला लावून बसणाऱ्या पत्रावळी फूल हार, दूर्वा इत्यादी विकणाऱ्यांना रोजगार प्राप्त होत आहे.