उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:20+5:302021-04-07T04:29:20+5:30

कोरोना काळात स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता सर्वांनीच हा विषय ...

Good health is the key to success | उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली

उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली

googlenewsNext

कोरोना काळात स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता सर्वांनीच हा विषय गांभीर्याने घेतल्याचे दिसते. युवक-युवती, विद्यार्थ्यांमध्येही जागृती वाढली. आरोग्य उत्तम असेल तर विविध क्षेत्रांत करिअर करण्यास मोठी मदत होऊ शकते.

-पुष्पकांत बोरकर जीम बाईज्, चंद्रपूर

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार व व्यायामही केला पाहिजे. कोरोना काळ हा सर्वांसाठी धक्कादायक आहे. बालकांपासून तर वृद्धांची काळजी हा गंभीरतेचा विषय आहे. कोरोनामुळे आहारबाबत जागृती वाढली. हा संपूर्ण कुटुंब व आयुष्याचाच भाग झाला पाहिजे.

-डॉ. गोपाल मुंदडा, बालरोग व आहारतज्ज्ञ, चंद्रपूर

कोरोनामुळे साराच समुदाय अस्वस्थतेत आहे. आपण वेळीच खबरदारी घेतली नाही तर अनेक संकटे निर्माण होतील. समस्या आहेत; पण त्या सोडविण्यासाठी मनाचे आरोग्य उत्तम राखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिग हा पर्याय आहे. यातून आपण अनेक समस्यांवर मात करू शकतो.

-डॉ. विवेक बांबोळे, मानसिक रोगतज्ज्ञ, चंद्रपूर

समाज माध्यमांवर खोट्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यामुळे अफवा व खोटी माहिती पसरविणाऱ्या ग्रुपमधून बाहेर पडावे, खात्री केल्याशिवाय पोस्ट फॉरवर्ड करू नये, ही नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे.

-मुजावर अली, पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राइम, चंद्रपूर

कोरोना संसर्गापासून कामाची पद्धत बदलली. आपले कर्तव्य पूर्ण करताना स्वत:चे व इतरांच्याही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, याच भान आले. संकट असताना विहित कालावधीत कामे कशी पूर्ण करायची, याचाही अनुभव आला. कोरोनामुळे नवीन वर्क कल्चर तयार झाले.

-दीपक जेऊरकर, अध्यक्ष राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर

Web Title: Good health is the key to success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.