आंब्याच्या, चिंचेच्या, वडाच्या नावाने चांगभलं... वेधताहेत लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:24+5:302021-02-22T04:17:24+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगर परिषद व अजय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विजासन बुद्ध लेणी परिसरात चारशे ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगर परिषद व अजय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विजासन बुद्ध लेणी परिसरात चारशे झाडांचे रोपण करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, लीना साळवे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, महाविदर्भ भिक्खू संघाचे संस्थापक सचिव विनय बोधी डोंगरे, अजय बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष स्वाती घोटकर, वर्षावास आयोजन समिती अध्यक्ष लीनता जुनघरे, उपाध्यक्ष संतोष आमने, आरोग्य सभापती नीलेश पाटील, वर्षा बोरकर, स्वाती बच्चूवार, सोनाली हेडाऊ, महेश शेंडे, छाया कांबळे, शीला खाडे, नंदा रामटेके, शालिनी गोडघाटे, प्रिय वंद वाघमारे, जयदेव खाडे, सूरज गावंडे, संतोष रामटेके, कवडू कांबळे, श्यामराव बोरकर यांच्यासह भद्रावती नगर परिषदेचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.