खूशखबर, कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:40 AM2020-12-14T04:40:04+5:302020-12-14T04:40:04+5:30

चंद्रपूर : रविवारी जिल्ह्यातील ९२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ५४ कोरोनाबाधित रुग्णांची ...

The good news is that the number of corona patients is declining | खूशखबर, कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

खूशखबर, कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

googlenewsNext

चंद्रपूर : रविवारी जिल्ह्यातील ९२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ५४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ३२० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार १८३ झाली आहे. सध्या ८०१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६० हजार ४१६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ३६ हजार ९६४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

रविवारी मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर शहरातील ४९ वर्षीय पुरूष व भद्रावती शहरातील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३६ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३०९ बाधिताचा समावेश आहे. रविवारी बाधीत आलेल्या ५४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १८, चंद्रपूर तालुक्यातील नऊ, बल्लारपुर दोन, भद्रावती चार, नागभीड दोन, मूल दोन, सावली एक, गोंडपिपरी दोन, राजुरा एक, चिमूर पाच, वरोरा एक, कोरपना तीन, जीवती एक तसेच इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

Web Title: The good news is that the number of corona patients is declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.