गोपानी आयर्नने मुख्य दाराला कुलूप लावून कामगारांना रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:28 AM2021-09-11T04:28:36+5:302021-09-11T04:28:36+5:30
संतप्त कामगारांची गेट समोर नारेबाजी घुग्घुस : गोपानी आयर्न ॲन्ड पाॅवरच्या व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता ...
संतप्त कामगारांची गेट समोर नारेबाजी
घुग्घुस : गोपानी आयर्न ॲन्ड पाॅवरच्या व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी सकाळी मुख्य गेटला कुलूप लावून सुमारे पाचशे ठेकेदारी कामगाराला कामावर येण्यास मज्जाव केला. यामुळे संतप्त कामगारांनी मुख्य गेटवर व्यवस्थापनाच्या विरोधात नारेबाजी करीत निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला.
या कारखान्याच्या कामगारांची वेतन वाढ व्हावी, यासाठी कारखान्याच्या कार्यालयासमोर ३० जुलैला नारेबाजी केली. कामगार संघटनाचे पदाधिकारी व व्यवस्थापनाची अनेकदा चर्चा झाली. मात्र वेतन वाढ करण्यापेक्षा वेतन कमी केले. तेव्हापासून कामगार संघटनेचे शांत मार्गाने आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सकाळी कारखान्याच्या व्यवस्थापनाने मुख्य गेटवर ठेकेदाराचे काम पूर्ण झाल्यामुळे काम बंद करण्यात आल्याचे सूचनापत्र लावून गेटला कुलूप ठोकले. या संदर्भात व्यवस्थापनाचे जबाबदार अधिकारी यांच्याशी भ्रमनसेवेवरून संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.