गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:36 PM2018-10-02T22:36:44+5:302018-10-02T22:37:04+5:30

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे.

Gosekhuddh Nahar's Chest | गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

Next
ठळक मुद्देअतोनात नुकसान : हजारो हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतात प्रामुख्याने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान पीक गर्भाशयात असताना पाण्याची नितांत आवश्यकता असते. प्रशासनामार्फत गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यांतर्गत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल व गर्भाशयात असलेले धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, अशा आशेत बळीराजा होता. गोसेखुर्दच्या कर्मचाऱ्यांकडून प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कंत्राटदाराने उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टरवरील धान पीक क्षणार्धात पाण्याखाली आले. त्यामुळे तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदीड, मूग, लाखोळी व तुरीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाºया खडतकर कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मुरुमामुळे शेताची प्रत खराब
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मुरूम गेले असून शेतजमीन निरोपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच छोट्या कालव्यामध्ये मुरूम गेल्यामुळे छोटा कालवा पूर्णत: दिसेनासा झाला आहे.
तहसीलदारांनी दिली घटनास्थळी भेट
सदर उजव्या कालव्याची पाळ फुटल्याची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सर्व्हेक्षण करून पंचनामा करण्याचा तलाठ्यांना आदेश दिला. त्यानंतर तलाठी मून, आकूलवार व कोतवाल अमित मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी महेश पिलारे, विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, सुनील राऊत आदी नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.
यापूर्वीही पाळीवर पडले होते भगदाड
यापूर्वीसुद्धा याच कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवर मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे शेतकºयांची पिके करपण्याच्या मार्गावर होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.

Web Title: Gosekhuddh Nahar's Chest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.