गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:10+5:302021-08-20T04:32:10+5:30

दत्तात्रय दलाल ब्रम्हपुरी : गोसीखुर्द धरण निर्मितीकरिता प्रशासकीय मान्यता सन १९८३ ला मिळाली. तेव्हापासून उजव्या व डाव्या कालव्याचे ...

Gosekhurd National Project work in abeyance | गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात

Next

दत्तात्रय दलाल

ब्रम्हपुरी : गोसीखुर्द धरण निर्मितीकरिता प्रशासकीय मान्यता सन १९८३ ला मिळाली. तेव्हापासून उजव्या व डाव्या कालव्याचे तसेच उपकालव्याचे काम सुरूच आहे. तब्बल ३८ वर्षानंतरही या कालव्याचे काम पूर्णत्वास आले नाही. सध्या ३७२ कोटी रुपयांच्या या कालव्याची वाढीव किंमत २२ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र, कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे अनेक बांधकामे रखडली आहेत.

राष्ट्रीय प्रकल्प म्हणून २००९ ला मान्यता देण्यात आलेला भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा हा कालवा असल्याने महत्त्वपूर्ण आहे. आसोलामेंढा तलावापर्यंत हा कालवा जातो. ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील सिंचनासाठी फार मोठा लाभ मिळणार आहे. परंतु शहरालगतच्या दुधवाही रस्त्याच्या बाजूला बांधकाम करण्यात आलेला जलसेतू पाण्याच्या प्रवाहाने २०१२ - २०१३ ला कोसळला. त्यामुळे दुधवाही रस्त्याच्या बाजूला अतिरिक्त पाणी सोडता यावे, भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दरवाजा (गेट)चे बांधकाम एम. के. एस. कांस्ट्रो व्हेंचर प्रा.ली. नागपूर या कंपनीस ५ जुलै २०१४ ला देण्यात आले आहे. या कामाची मूळ निविदा किंमत १५०३.९० लक्ष असून यामध्ये चार कामांचा समावेश आहे.तर कोसळलेल्या जलसेतूचे ( सा. क्र. ४५६६१) अप्रोचेसच्या मजबुतीकरणाचे काम मे.एस. ई. डब्लू इंद्रस्त्रकचार ली.हैदराबाद यांना १३ जुलै २०१६ देण्यात आले आहे. या कामाची निविदा रक्कम १४४५.५०,०३७ इतकी आहे. मात्र, ही दोन्ही कामे तब्बल १० वर्षाच्या कालावधीनंतरही अपूर्ण अवस्थेत आहेत. दोन्ही कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोट

अप्रोच रोडचे काम एन. बी. सी.सी. कंपनीकडे देण्यात आले आहे. तर किरकोळ दुरस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुटफूट झालेली कामे नव्याने करण्यात येईल. दंडात्मक कारवाई दोन्ही कंपनीवर करण्यात आली आहे. जून २२ पर्यंत दोन्ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.

- जे. बी. मडावी,

सहायक अभियंता ( श्रेणी १ )

गोसेखुर्द उजवा कालवा,

उपविभाग क्रमांक ५

190821\img_20210727_122410.jpg

अपूर्ण अवस्थेत असलेले गेतचे काम

Web Title: Gosekhurd National Project work in abeyance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.