लॉकडाऊ नमुळे गोसेखुर्दची कामे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:00 AM2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:45+5:30
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येते असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामासाठी आसोलामेंढा प्रकल्प नुतणीकरण विभाग क्र. १ व क्र.२ अंतर्गत सुमारे ९०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली असतानाच लॉकडाऊनमुळे जागेवरच थांबली आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांव्दारे शेतापर्यंत पाणी पोहचविले जाणार आहे. तर काही भागात कालवे प्रणालीने पाणी पोहचविले जाणार आहे. अनेक कालवे दुरूस्तीकरिता तोडफोड करण्यात आलीे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : कोरोनाच्या संकटाने जगभरात थैमान माजविले असताना भारतातही झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे सावली तालुक्यात सुरू असलेली गोसेखुर्द प्रकल्पाची अनेक कामे प्रभावित झालेली आहेत. शेतीच्या सिंचनाचा प्रश्न भेडसावणार असल्याचे बोलले जात आहे.
सावली तालुक्यात बारमाही सिंचनाची सोय होण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. मात्र कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग थांबले असताना गोसेखुर्द प्रकल्पाची अनेक छोटी-मोठी कामे थांबविण्यात आलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्न निर्माण झाला आहे. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येते असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामासाठी आसोलामेंढा प्रकल्प नुतणीकरण विभाग क्र. १ व क्र.२ अंतर्गत सुमारे ९०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली असतानाच लॉकडाऊनमुळे जागेवरच थांबली आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांव्दारे शेतापर्यंत पाणी पोहचविले जाणार आहे. तर काही भागात कालवे प्रणालीने पाणी पोहचविले जाणार आहे. अनेक कालवे दुरूस्तीकरिता तोडफोड करण्यात आलीे आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे संपूर्ण मजूर वर्ग आपल्या गावाकडे परत गेल्याने कामे अर्धवट स्थितीत आहेत. जेसीबी आणि पोकलँडव्दारे होणारी कामे सुरू असली तरी प्रत्यक्ष मजुरांमार्फतीने करण्यात येणारी कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. सिंचनाच्या दृष्टीने करण्यात येणारी कामे पुढील दोन महिन्यात पूर्ण झाली नाही तर सिंचनाचा प्रश्न आवासून उभा ठाकणार आहे.