गोसेखुर्दचे पाणी ठरले पाथरी गावासाठी वरदान

By admin | Published: June 2, 2016 02:44 AM2016-06-02T02:44:31+5:302016-06-02T02:44:31+5:30

विदर्भातील शेतकरी हा आळशी किंवा व्यसनी नाही. सिंचनाची सोय असली तर २४ तास राबणारा हा या मातीतला कास्तकार आहे.

Gosekhurd's water is a boon for Patheri village | गोसेखुर्दचे पाणी ठरले पाथरी गावासाठी वरदान

गोसेखुर्दचे पाणी ठरले पाथरी गावासाठी वरदान

Next

एकरी २० क्विंटल उत्पादन : ७०० एकरमध्ये उन्हाळी पिकाची लागवड
सावली : विदर्भातील शेतकरी हा आळशी किंवा व्यसनी नाही. सिंचनाची सोय असली तर २४ तास राबणारा हा या मातीतला कास्तकार आहे. यावर्षी तालुक्यातील खरीप हंगाम गेला. कास्तकार हवालदिल झाला. पण पाथरी गावाने गोसेखुर्दच्या पाण्याचा वापर करून उन्हाळी धानपिकाची लागवड केली. ७०० एकरमध्ये धानपिक लागवड झाली. यात उत्पादन एकरी २० क्विंटल आल्याने शेतकरी, मजूर आनंदी झाला आहे.
सावली तालुका खरीप हंगामात दुष्काळी स्थितीमध्ये गेला. तालुक्यातील पाथरी गावातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी उन्हाळी पिक घेण्याचे ठरवले. आसोला तलावात पाणी उपलब्ध होते.
फक्त शेतकऱ्यांची तयारी पाहिजे होती. यात गावचे उपसरपंच तुकाराम ठिकरे स्वत: शेतकरी आहेत. त्यांनी गावाची बैठक बोलावून दुबार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी करावी यासाठी प्रयत्न केले. ते फायद्याचे ठरले.
मळणी झाल्यावर शासकीय खरेदी केंद्र सावली येथे आपला माल आणून विक्री करत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

गोसेखुर्दचे पाणी
आसोला तलावात सोडावे
येत्या काही दिवसांत तालुक्यात पऱ्हे-आवत्याचा हंगाम सुरू होईल. तेव्हा गोसेखूर्दचे पाणी आतापासून आसोला तलावात सोडावे. जेणेकरून तलाव भरेल व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळू शकेल.

Web Title: Gosekhurd's water is a boon for Patheri village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.