आठ दिवसात शेतकऱ्यांना गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:18 AM2019-07-15T00:18:46+5:302019-07-15T00:19:21+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी येत्या आठ दिवसात म्हणजेच पुढील आठवडयात गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Gosekhurd's water will be available to the farmers in eight days | आठ दिवसात शेतकऱ्यांना गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध होणार

आठ दिवसात शेतकऱ्यांना गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध होणार

googlenewsNext
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : शेतकऱ्यांनो घाबरू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी येत्या आठ दिवसात म्हणजेच पुढील आठवडयात गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी न घाबरता खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीसाठी पूर्वतयारी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
मागील वर्षी ३९० मिमी पाऊस पडला होता तर यावर्षी फक्त २१० मिमी असा अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे या परिसरातील धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पुढे काय होणार या विवंचनेत येथील शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहात आहे. सध्याच्या परिस्थितीत पावसाने हुलकावणी दिल्याने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. अशावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून येत्या आठ दिवसात गोसेखुर्दचे पाणी शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पत्रकार परिषद घेऊन दिली. एकूण चार हजार ३०० एकर शेतजमिनीला गोसेखुर्दचा पाणी पुरवठा होणार असल्याचेही यावेळी सांगितले. तसेच येत्या तीन वर्षात बारामतीपेक्षाही मोठी म्हणजेच महाराष्ट्रात सर्वात मोठी सिंचनक्षमता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात उपलब्ध होऊन ८०-८२ तलाव गोसेखुर्दच्या कालव्यांना जोडली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत ४३ हजार एकराचा पूर्ण हंगाम होईल एवढा पाणी पुरवठा गोसेखुर्दच्या धरणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असेही यावेळी स्पष्ट केले. गोसेखुर्दच्या कामाला गती प्राप्त व्हावी, यासाठी यावर्षी १०७० कोटी रुपयांचे टेंडर काढले असून जर मी पूर्णवेळ मंत्री असतो तर सध्याचे चित्र फार वेगळे असते. एक वर्षे मंत्री असताना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्द प्रकल्पासाठी चार हजार ९०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळेच गोसेखुर्दच्या कार्याला गती प्राप्त झाली असल्याचे आ. वडेट्टीवार म्हणाले. २०२० च्या हंगामात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील काही भागात डबल फसलसाठी गोसेखुर्दचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही सांगितले आणि म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत पावसाने जरी डोळे वटारले असले तरी आम्ही शेतकऱ्यांना आश्वस्त करीत असून भविष्यात गोसेखुर्द धरण शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. शहरातील बारई तलाव अधिग्रहित करण्याचा मानस असून सौंदर्यीकरण करण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Gosekhurd's water will be available to the farmers in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.