गोसीखुर्दचे पाणी शेतकºयांना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:33 PM2017-08-25T23:33:58+5:302017-08-25T23:34:20+5:30
यावर्षीच्या अत्यल्प पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांची अगनीकता पाहुन या क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरील सुरू असलेल्या .....
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : यावर्षीच्या अत्यल्प पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांची अगनीकता पाहुन या क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरील सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.
जिह्यातील सर्वात मोठा असलेला ब्रिटीशकालीन आसोलामेंढा तलाव सावली आणि मुल तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणार होता. मात्र या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे तलावात पाणी साठा कमी असल्याने पिकांना शेवटर्पंत पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याकरिता क्षतीग्रस्त झालेले गराडी नाल्यावरील सेतूचे बांधकाम पूर्ण होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी गराडी नाल्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात किंवा त्याच नहराने शेतकºयांना देणे आवश्यक झाले आहे. सदर नालयावरील क्षतिग्रस्त झालेले काम पूर्ण झाले की, नाही हे प्रत्यक्ष पाहुन गोसीखुर्दचे पाणी असोला मेंढा तलावाच्या दिशेने सोडण्याच्या सूचना आ. वडेट्टीवारांनी दिल्या.
शेतकºयांची दयनीय अवस्था पाहून कणव निर्माण झालेला लोकप्रतिनिधी सावली- ब्रह्मपुरी क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरचे बांधकाम गांभीर्याने घेऊन एक सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्याचा शासनाला इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांनी २४ आॅगस्टला प्रायोगिक तत्वावर पाणी सोडले आहे. येत्या चार दिवसात प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे. या क्षेत्राचे आ. वडेट्टीवार यांनी जातीने लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढला हे विशेष.
याप्रसंगी काँग्रेसचे सावली तालुका अध्यक्ष राजू सिध्दम, शेतकरी राईस मिल सावलीचे अध्यक्ष मोहन गाडेवार, सावलीचे नगरसेवक संदीप पुण्यपवार, निखील सुरमवार व अनेक सहकारी उपस्थित होते.