गाव विकासासाठी शासन कटिबद्ध
By Admin | Published: August 26, 2014 11:22 PM2014-08-26T23:22:27+5:302014-08-26T23:22:27+5:30
ग्रामीण विकासासाठी जनतेने शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतोय ग्रामीण भागाच्या विकासासाठी
सुभाष धोटे यांचे मनोगत : चनाखा-पंचाळा रस्ता कामाचे भूमिपूजन
चंद्रपूर : ग्रामीण विकासासाठी जनतेने शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतोय ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी चनाखा येथे केले.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील १० लाख रुपये खर्चाच्या चनाखा ते पंचाळा रस्त्याचे भुमिपूजन मंगळवारी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला चनाखाच्या सरपंच शोभा लोखंडे, उपसरपंच विकास देवाळकर, ग्रा.पं. सदस्य कमलेश सातपुते, रेखा आकनुरवार, रेखा सातपुते, आनंदराव गावंडे, सरपंच पंचाळा, उपसरपंच मंगेश मडावी, माजी सरपंच सुधाकर गिररसावळे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज किटे, शशिकांत वडस्कर, पांडूरंग सातपुते, भाऊराव आकनुरवार, संदीप सातपुते, संतोष बोबडे उपस्थित होते.
चनाखा गावाच्या विकासासाठी मागील पाच वर्षांत आमदार सुभाष धोटे यांनी विविध योजनांअंतर्गत बंधारे बांधकामासाठी १० लाख, शिवार रस्ता पाच लाख, नागोबा साळवे यांच्या घराजवळील सिमेंंट रस्त्यासाठी पाच लाख, बोबडे यांच्या घराजवळील सिमेंंट रस्त्यासाठी दोन लाख, बेघर दलित वस्तीसाठी चार लाख, दलित वस्ती सामाजिक सभागृहासाठी सात लाख, इंदिरा आवास योजनेअंतर्गत २० घरकूलांसाठी १५ लाख, सात शेतकऱ्यांना सिंचनासाठी जवाहर विहिर योजनेअंतर्गत सात लाख, दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईअंतर्गत दोन लाखांची ट्युबवेल असा ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिली.
चनाखा ते पंचाळा या दुर्लक्षित रस्त्याची मागील २० वर्षांपासून दयनिय व बिकट परिस्थिती होती. सदर बाब आमदार सुभाष धोटे यांनी गांभीर्याने घेवून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करुन घेतला. त्या निधीअंतर्गत रस्ता बांधकामाचे भुमिपूजन पार पडले. गावाच्या विकासासाठी आमदार धोटे यांनी केलेल्या विकास कार्याची प्रशंसा गावकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)