महाराजस्व अभियानामार्फत शासन जनतेच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:15 AM2018-01-07T00:15:54+5:302018-01-07T00:16:13+5:30
राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शासनाचा मुळ उद्देश सार्थ होत नाही. त्यामुळे शासनाने आता प्रशासनाच जनतेच्या दारात नेण्याचा व ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराजस्व अभियानामार्फत प्रशासनाला जनतेच्या दारात आणले असून जनतेने या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आमदार अॅड. संजय धोटे यांनी केले.
राजुरा तालुक्यातील देवाडा येथे महसूल विभागाद्वारे महाराजस्व विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, सरपंच लक्ष्मीबाई पंधरे, नायब तहसीलदार बन्सोड, आईदलवार, भाजपा महामंत्री दिलीप वांढरे, वामनराव तुरानकर, उपसरपंच अब्दुल जावेद, मंजुषा अनमुलवार, ईश्वर मुंडे, शिवा बोकुर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार धोटे पुढे म्हणाले, नागरिकांच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाराजस्व अभियान ही महत्त्वाकांशी योजना सुरु केली. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे, अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच जनतेच्या सोईकरिता योजनेच्या अर्जामध्ये सुटसुटीकरण केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच जनतेने कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. या शिबिरात संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, याबाबतचे अर्ज स्वीकारून तात्काळ निर्णय घेण्यात आल. त्यानंतर आ. अॅड संजय धोटे यांच्या हस्ते शेतकºयांना सातबाराचे वितरण करण्यात आले. संचालन श्रीनिवास मंथनवार यांनी केले.