शासकीय कृषी महाविद्यालय मुलांसाठी ६१ कोटींचा प्रस्‍ताव मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:30 AM2021-02-11T04:30:44+5:302021-02-11T04:30:44+5:30

चंद्रपूर : जिल्‍ह्यातील मूल येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत व वसतिगृह बांधकामासाठी पहिल्‍या टप्‍प्‍यात ६१ कोटी रुपये किमतीचा प्रस्‍ताव ...

Government Agricultural College invited proposal of Rs. 61 crore for children | शासकीय कृषी महाविद्यालय मुलांसाठी ६१ कोटींचा प्रस्‍ताव मागविला

शासकीय कृषी महाविद्यालय मुलांसाठी ६१ कोटींचा प्रस्‍ताव मागविला

Next

चंद्रपूर : जिल्‍ह्यातील मूल येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत व वसतिगृह बांधकामासाठी पहिल्‍या टप्‍प्‍यात ६१ कोटी रुपये किमतीचा प्रस्‍ताव सादर करण्‍याच्‍या सूचना विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना दिल्‍या.

शासकीय कृषी महाविद्यालय मूल संदर्भात आज विधानभवन मुंबई येथे आमदार मुनगंटीवार यांनी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्‍यासह बैठक घेतली. यावेळी झालेल्‍या चर्चेत आमदार मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर जिल्‍हा हा नक्षलप्रभावित जिल्‍हा आहे. या ठिकाणी असणारा शेतकरी उत्‍तम तंत्रज्ञ, उत्‍तम कृषिज्ञान प्राप्‍त व्‍हावा, यादृष्‍टीने मागील सरकारच्‍या कार्यकाळात मूल तालुक्‍यातील सोमनाथजवळ शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्‍यात आले आहे, परंतु अद्याप या महाविद्यालयाच्‍या इमारत व वसतिगृह बांधकामासाठी कोणतेही नियोजन करण्‍यात आलेले नाही. यासंदर्भात निधीच्‍या मागणीचा प्रस्‍ताव कृषी परिषद पुणे यांच्‍या मार्फत शासनाच्‍या बांधकाम प्रस्‍ताव उच्‍चस्‍तर समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्‍यात आलेला आहे. मात्र अद्याप यासाठी निधी उपलब्‍ध झालेला नाही. सदर कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत व वसतिगृह बांधकामासाठी पहिल्‍या टप्‍प्‍यात ६१ कोटी रुपये किमतीचा प्रस्‍ताव सादर करण्‍याच्‍या सूचनाही दिल्या. प्रस्‍ताव लवकरच सादर करण्‍यात येईल, असे आश्‍वासन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आमदार मुनगंटीवार यांना दिले.

Web Title: Government Agricultural College invited proposal of Rs. 61 crore for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.