ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:44+5:30
राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान सेल, अल्पसंख्यक विभाग, एनएसयुआय, व्यापारी वर्ग आणि विविध संस्थांच्या वतीनेसुध्दा दोघांचाही सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : महाविकास आघाडीचे सरकार जनकल्याणासाठी काम करणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह, निराधार, अपंग महिलांसाठी घरे, आदिवासी विद्यार्थ्यांच्या धर्तीवर ओबीसी गरीब मुलांना सीबीएसई शाखेच्या उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, अशी व्यवस्था निर्माण करणार आहोत. राजुरा मतदार संघातील ३०० तरूणांना व्यावसायिक उद्देशाने प्रत्येकी एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, राजुरा नगर परिषदेचे सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढले जातील. यासाठी १० कोटी रुपये विकास निधी राज्य सरकार राजुरा नगर परिषदेला देणार असल्याचे आश्वासन असे आश्वासन राज्याचे खार जमीन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान सेल, अल्पसंख्यक विभाग, एनएसयुआय, व्यापारी वर्ग आणि विविध संस्थांच्या वतीनेसुध्दा दोघांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार सुभाष धोटे म्हणाले, पाच वर्षांत राजुरा विधानसभा क्षेत्राला अतिशय दुय्यम वागणूक मिळाली. अनेक प्रश्न ताटकळत पडले. राजुरा नगर परिषदेच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर अडवणूक झाली. मात्र आता आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्व रेंगाळलेले आणि आवश्यक नवीन विकासकामे पूर्ण व्हायला हवीत ही जनतेची मागणी आहे. अशी भुमिका मांडली.
यावेळी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष दादा पाटील लांडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रकाश देवतळे, हमीदभाई, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, जि. प. सदस्य मेघा नलगे, गटनेता रमेश नळे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, मुख्याधिकारी आर्शिया जुही आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे तर संचालन व आभार प्रदर्शन विजय जांभूळकर यांनी केले.