प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:14 PM2018-11-10T22:14:13+5:302018-11-10T22:15:24+5:30

ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासोबतच काळानुसार सेवांमध्ये बदल केल्या जात आहेत. ग्रामीण व शहरी समुदायाला जोडून दळवळणाची साधने अत्याधुनिक करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ते शिर्डी शिवशाही शयनयान फेरीच्या शुभारंभाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.

Government committed to provide quality facilities to passengers | प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध

प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर ते शिर्डी शिवशाही बसचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासोबतच काळानुसार सेवांमध्ये बदल केल्या जात आहेत. ग्रामीण व शहरी समुदायाला जोडून दळवळणाची साधने अत्याधुनिक करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ते शिर्डी शिवशाही शयनयान फेरीच्या शुभारंभाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.
चंद्रपूर बसस्थानकात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक पाटील, वाहतूक अधिकारी तरोडे, यंत्र अभियंता हेडावू, कामगार अधिकारी शंभरकर, आगार व्यवस्थापक डफरे आदींची उपस्थिती होती. शनिवारपासून सुरू झालेल्या शिवशाही बसमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना आता थेट शिर्डीला जायला मिळणार आहे.
शिवशाही बसेसला ४ थांबे देण्यात आले आहेत. चंद्रपूरच्या आगारातून ही बस दररोज दुपारी ३ वाजता सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० ला शिर्डी येथे पोहचणार व शिर्डी आगारातून सायंकाळी ५.३० सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता चंद्रपूरला पोहचेल. ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद जोपासणाऱ्या  एसटी महामंडळाने दिवाळीच्या शुभपर्वावर चंद्रपूर ते शिर्डी शयनयान बससेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती.
शनिवारीवारपासून सदर बससेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना शिर्डीपर्यंतचा प्रवास करणे सोईस्कर झाले आहे.
बसचे प्रवासभाडे चंद्रपूर ते शिर्डीसाठी दोन हजार पाच रुपये, जेष्ठ नागरिकांकरिता एक हजार ४३० रुपये राहणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली.
विकासाकरिता मुबलक निधी
जिल्ह्यातील कोट्यवधी रूपयांची विकासकामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली. शासनाने निर्धारित केलेल्या कालावधीत विकासकामे पूर्ण व्हावीत, याकरिता निधीची कमतरता पडू दिल्या जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी दिली. यावेळी विभाग नियंत्रक पाटील यांनी मंडळाच्या प्रगतीची माहिती सादर केली.

Web Title: Government committed to provide quality facilities to passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.