नैसर्गिक आपातग्रस्तांना घरपोच शासकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:23 PM2017-10-01T23:23:18+5:302017-10-01T23:23:33+5:30

नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमवावा लागलेल्या कर्त्यापुरुषांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.

 Government Emergencies From Home | नैसर्गिक आपातग्रस्तांना घरपोच शासकीय मदत

नैसर्गिक आपातग्रस्तांना घरपोच शासकीय मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमवावा लागलेल्या कर्त्यापुरुषांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या बाबींना बगल देत आ. बाळू धानोरकर यांनी लाभार्थ्यांच्या घरी जावून थेट धनादेश वाटपाचा उपक्रम वरोरा व भद्रावती तालुक्यात राबविणे सुरु केले आहे.
महारोगी सेवा समिती आनंदवन येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला होता. पशुधन खरेदीकरिता शासनाने ५० हजार रुपयांचा धनादेश आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते महारोगी सेवा समितीला आनंदवन ग्रामपंचायतीमध्ये देण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी बुधे, तलाठी वानखेडे उपस्थित होते.
वरोरा तालुक्यातील परसोडा येथील यशवंत पावडे या शेतकºयाचा शेतात वीज कोसळल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी गिता पावडे यांना चार लाख रुपयांचा धनादेश आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आला. खांबाडा येथील धनराज दांडेकर या शेतकºयाने आत्महत्या केली होती. मृताची पत्नी पपिता दांडेकर यांना एक लाख रुपयांचा धनादेश आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन गोसावी, मंडळ अधिकारी भांदककर, तलाठी कोटरंगे व ग्रामस्थ उपस्थित आहे. ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाने लाभार्थ्यांना मोठा फायदा होत असल्याचे मानले जात आहे. जळका येथील विठ्ठल गानफाडे यांच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांना ३० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. माढेळी येथील केशव बोरीकर यांच्या मालकीचा एक बैल नैसर्गिक आपत्तीने मृत पावला. त्यांना २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या उपक्रमाने अनेकांना दिलासा मिळाला.

Web Title:  Government Emergencies From Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.