नगर परिषदेकडून शासकीय निधीची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 02:04 AM2017-04-03T02:04:38+5:302017-04-03T02:04:38+5:30
देलनवाडी प्रभाग क्रं. ४ मध्ये रहिवासी नसलेल्या ठिकाणी डांबरी रस्ता आणि १५ ते २० वर्षांपासून वास्तव्य
ब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभाग क्रं. ४ मध्ये रहिवासी नसलेल्या ठिकाणी डांबरी रस्ता आणि १५ ते २० वर्षांपासून वास्तव्य असलेला रस्ता दुर्लक्षित ठेवण्यात आल्याने नगर परिषदेकडून एक प्रकारे शासकीय निधीची उधळण केली जात आहे.
ब्रह्मपुरी शहर देलनवाडी, आरमोरी रोड व वडसा रोड आदी भागात वाढत गेले आहे. या भागात १५ ते २० वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत परंतु या भागातील रस्त्यावर साधे खडीकरण केले जात नाही. य्याबाबत नागरिकांनी निवेदन दिले आहे. पण नगरसेवकांच्या दबावाखाली डावलल्या जात आहे. मुख्याधिकारी प्रशासन चालविण्यात कमी पडत आहे की काय, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. देलनवाडी प्रभागात काही भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. ते डांबरीकरण अर्र्ध्या भागात नागरिक राहत नाही, अशा ठिकाणी केले गेले आहे. त्या डांबरीकरणाचा उपयोग वॉकिंगसाठी केला जात आहे. तर दुसरीकडे वसाहतदार आहे. त्या रस्त्यावरुन हजारो नागरिक रोज वाहनाने अथवा पायी ये-जा करीत असता. पण त्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याचे काम करण्यास प्राधान्य दिले जात नाही.
या रस्त्याचे काम करण्यासाठी पहिलांदा बांधकाम विभागाने त्याचे सर्वेक्षण केले नाही. तर काही नगरसेवक दबाव टाकून कामे केली जातात, असा नागरिकांचा आरोप आहे. घरभाडे, पाणीपट्टी भरण्यासाठी तगादा लावला जातो. परंतु मूलभूत सुविधा देण्यास नगर परिषद मागे पडली आहे. प्रशासनाने ही गंभीर बाजू तपासून घेऊन विकास कामांना प्राधान्य दिले पाहिजे. जनतेने निवडून दिलेले नगरसेवकच अशा पद्धती वागत असतील तर त्यांना नागरिक धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असाही सूर नागरिक बोलून दाखवित आहेत. मुख्याधिकारी यांनी अशा कामांवर लक्ष घालून प्राधान्याने कामे करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)