शासनाने धानाचा बोनस तातडीने जमा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:10+5:302021-04-29T04:21:10+5:30
सावरगाव : कोरोना काळात शेतकरीही आर्थिक टंचाईने पिसल्या जात असून, प्रति क्विंटल धान खरेदीवर शासनाने ७०० रुपये ...
सावरगाव : कोरोना काळात शेतकरीही आर्थिक टंचाईने पिसल्या जात असून, प्रति क्विंटल धान खरेदीवर शासनाने ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. तो अजूनपर्यंत शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही.त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करावा, अशी मागणी नागभीड तालुक्यातील समस्त शेतकरी वर्गाने केली आहे.
कोरोना महामारीच्या लाटेत शेतकरीही हवालदिल झाला असून, शासनाने बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना धानाच्या प्रति क्विंटलप्रमाणे ७०० रुपये बोनस मिळणार होता. तो अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तो मिळणार की नाही, सर्वसाधारण एप्रिल महिन्यात बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती, पण या वर्षी एप्रिलही लोटून जात आहे. मात्र, बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. यावरून शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
कोट
सर्वसाधारण एप्रिल महिन्यात बोनस जमा होईल, असे वाटत होते. मात्र, एप्रिल महिनाही संपण्याच्या मार्गांवर असताना, बोनस मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
- प्रवीण खोब्रागडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सावरगाव.