वीज टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय दराने मोबदला द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:43 PM2017-11-27T23:43:43+5:302017-11-27T23:44:37+5:30
रायपूर-राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन कंपनीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करून टॉवर उभारणीचे काम केले.
आॅनलाईन लोकमत
चिमूर : रायपूर-राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन कंपनीने शेतकºयांच्या उभ्या पिकाची नासाडी करून टॉवर उभारणीचे काम केले. मोबदला देण्याची वेळ आली असता, केवळ भूलथापा दिल्या जात आहेत. शासकीय नियमाप्रमाणे मोबदला न दिल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी सचिन सोनटक्के व शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिंह वर्मा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव घातला व निवेदन सादर केले.
चिमूर तालुक्यातील चिचघाट, येरखंडा, खडसंगी, आमडी, शिवापूर बंदर, शिवरा, गदगाव, मागलगाव शिरसपूर, पिटीचुवा, रेगाबोडी, तिरखुरा, मिनझरी, भिवकुंड, शेंडेगाव, वाहाणगाव, खैरी व शंकरपूर येथील शेतकºयांचा यावेळी समावेश होता
कंपनीने दडपशाही करून पोलिसांचा वापर करीत मोबदला दिला नाही, शासनाच्या ३१ जून २०१७ च्या निर्णयानुसार मोबदला दिला जात नाही, असे निवेदनात म्हटले आहे. कंपनीने शेतकऱ्यांची सभा घेऊन मोबदल्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. े
निवेदन देताना टॉवर प्रभावित शेतकऱ्यांचे नेते सचिन सोनटक्के, शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिंह वर्मा, रामेसवर ढोने, अमृत ननावरे, रमेश कोलते, सुशीला ननावरे, दिवाकर गायकवाड, गोपीचंद खाद्यसंग, रामदास शंभरकर, तुळशिराम गायकवाड, रामेश्वर ढोये, अशोक शंभरकर, गोविंदा रोकडे, तातोबा चट्टे, श्रीकृष्ण वाकडे, रामेश्वर मांडवकर, कल्पना चंदेल, चंद्रभान वाकुलकर, मधुकर भोयर आदींचा सहभाग होता.