शेतकऱ्यांना बळ देण्यास सरकार तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:28 AM2018-11-02T00:28:29+5:302018-11-02T00:29:57+5:30
केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक सरकार तत्पर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. खांबाळा येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार अरूण अडसड, आमदार नाना शाामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, अनिल बुजोणे, बाबा भागडे, राजेश मुन, वरोरा पं.स. सभापती रोहीणी देवतळे, भद्रावती पं. स. सभापती विद्या कांबळे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष अध्यक्ष एहतेशाम अली, चंद्रकांत गुंडावार, तुळशिराम श्रीरामे, नरेद्र जिवतोडे, जि.प. सदस्य राजु गायकवाड, विजय मोकाशी, सोमलकर, ओमप्रकाश मांडवकर, रवी कष्टी, जि.प. सदस्य ज्योती वाकडे, दाते, पं.स. सदस्य प्रवीण ठेंगणे, पं. स. सदस्य नाजुका मंगाम, भद्रावती न. प. सदस्य प्रशांत डाखरे, धनंजय पिंपळशेंडे, सतीश दांडगे, उमश बोढेकर, सुरेश महाजन, वसंता बावणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार अडसड यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. जनतेसाठी सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांना घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाण्याचे आवाहनही केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण योजना यासारख्या योजनातून पाण्याची पातळी वाढवण्याची सुरू असलेली धडपड हे बघता पुढील दोन ते तीन वर्षांंमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असेही सांगितले.
दरवर्षी शेती करण्याइतपत पैसा त्यांच्या हातात असेल. शेतकरी पूर्णत: स्वावलंबी होईल अशाच पद्धतीचे नियोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने करीत आहे. आमदार शामकुळे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कृषी योजना व माजी मंत्री संजय देवतळे यांनी जिल्ह्यातील शेतकºयांच्या स्थितीबद्दल विचार मांडले.