शासनाचे ६५ कोटी पाण्यात

By Admin | Published: May 16, 2017 12:36 AM2017-05-16T00:36:58+5:302017-05-16T00:36:58+5:30

राज्य सरोवर संवर्धन योनजेअंतर्गत राज्य शासनाने ब्रह्मपुरी नगर परिषदेअंतर्गत कोट तलाव पर्यावरण

In the government's 65 crores of water | शासनाचे ६५ कोटी पाण्यात

शासनाचे ६५ कोटी पाण्यात

googlenewsNext

विजय वडेट्टीवार : कोट तलाव सौंदर्यीकरणात घोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : राज्य सरोवर संवर्धन योनजेअंतर्गत राज्य शासनाने ब्रह्मपुरी नगर परिषदेअंतर्गत कोट तलाव पर्यावरण व सौंदर्यीकरण करणाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. त्यामुळे या कामात खर्च करण्यात आलेले ६५ कोटी रुपये पाण्यात गेले, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.
आ. वडेट्टीवार म्हणाले की, २०१३-१४ या आर्थिक वर्षात २ कोटी १२ लाख ११ हजार ७२१ रुपये मंजूर करण्यात आले. या कामात महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभागाने आॅगस्ट-२०१२ मध्ये तांत्रिक मंजुरी दिली. या कामाची निविदा ब्रह्मपुरी नगर परिषदेने १५ जानेवारी २०१३ रोजी प्रकाशित केली. त्यानुसार पूजा कन्स्ट्रक्शनशी ६ जून २०१४ रोजी करारनामा करण्यात आला. या करारनाम्यामध्ये अंदाजपत्रकानुसार काम करण्यात यावे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. तरीही प्रत्यक्ष तलावातील काम व कागदावरील दाखविण्यात आलेल्या कामाचे अवलोकन केल्यास मोठा फरक आहे. गरज नसताना सभोवताल आधी पथदिवे शासनाचे ६५ कोटी रुपये कोट तलावाच्या पाण्यात वाहून गेले आहेत, असाही आरोप आ. वडेट्टीवार यांनी जसंपर्क कार्यालयात बैठकीदरम्यान केला आहे.
ब्रह्मपुरी नगर परिषदतंर्गत येत असलेला कोट तलावाचे सौंदर्यीकरण करण्याकरिता पूजा कन्स्ट्रक्शन या कंपनीला वर्कआॅर्डर देण्यात आले. कामाचे मोजमाप आणि देखरेख करण्याकरिता ले-आऊट रेखांकन स्थापत्य अभियांत्रिकी तांत्रिक सेवा पुरवठादार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती पीएमसीने जेडी असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलन प्रो. इंजि. गोरडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित कंत्राटदाराने नगर परिषदेशी संगनमत करुन केवळ २० ते ३० टक्के काम केले.
यामध्ये जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचा गैरववापर करुन शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप आ. वडेट्टीवार यांनी केला आहे. तलावाचे काम पूर्ण न करता चारही बाजूने पथदिवे लावून ६५ कोटी रुपये शासनाचे पाण्यात बुडविले आहे. या सर्व कामाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Web Title: In the government's 65 crores of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.