सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा कॉग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:32 PM2018-11-09T22:32:03+5:302018-11-09T22:32:21+5:30
नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाले. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात महात्मा गांधी पुतळ्यासमोर शुक्रवारी दुपारी १ वाजता निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाले. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात महात्मा गांधी पुतळ्यासमोर शुक्रवारी दुपारी १ वाजता निदर्शने करण्यात आली.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, वित्तमंत्री अरूण जेटली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निषेधात्मक कार्टून फलक लावले होते. या यावेळी मोदी सरकार हाय - हाय, मोदी सरकारचा निषेध असो, नोटबंदी करणाऱ्या सरकार चा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या. नोटबंदी करून देशाला व जनतेला कोणताही फायदा झाला नाही. म्हणून चंद्रपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध करण्यात आल्याचे नागरकर यांनी सांगितले. नोटबंदीमुळे किती काळा पैसा जमा झाला. कोणाकडून जमा झाला या नावाची यादी जाहीर करावी तसेच भारताच्या कोणत्या नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रूपये जमा केले. याची माहिती देशाच्या चौकीदाराने जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, महिला अध्यक्ष चित्रा डांगे कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, नगरसेवक अमजद अली इराणी, शालिनी भगत हरिदास लांडे, वंदना भागवत, श्याम राजुरकर, राजेंद्र अवघडे, मोहन डोंगरे, घनशाम वासेकर, बंडोपंत तातावार, राजेंद्र आत्राम, प्रकाश सरगम, मधूकर गोरे, सुरेश थोरात, नितीन नंदीगमवार, राजू दास यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.