अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनाची वाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:34 PM2019-01-02T22:34:05+5:302019-01-02T22:34:21+5:30
भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्यात आली नाही. यामध्ये केंद्र शासनाचे ६० टक्के व उर्वरित राज्य शासन देण्याचे ठरले. मात्र केंद्र सरकार देत नसेल, तर आम्हीही देणार नाही, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. ही फसवेगिरी बंद करुन केंद्र शासनाची वाढ पूर्णता द्यावी, असे आवाहन अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष (राज्य) रमेशचंद्र दहीवडे यांनी केले.
अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रमेशचंद्र दहीवडे पुढे म्हणाले, सत्तेवर असलेला भाजप सरकार केवळ घोषणा करीत असतो. मात्र अंमलबजावणी शून्य आहे. त्याविरोधात अंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शोभा बोगावार, संध्या खनके, राधा सुंकरवार, पवित्रा ताकसांडे, साधना नाखले, गुजाबाई डोगे उपस्थित होते.
८ जानेवारीला मोर्चा
अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीसंदर्भात संघटनेतर्फे अनेकदा अंदोलन करण्यात आले. दरम्यान केंद्र शासनाच्या मागण्यानुसार दीड हजार च्या ६० टक्के राज्य सरकार व उर्वरीत ४० टक्के राज्य सरकारला द्यावे लागेल.
मात्र सद्याचे चित्र वेगळे दिसत असून शासनाने फसवेगिरी बंद करावी, केंद्र शासनाची वाढ पूर्णत: द्यावी, या मागणीला साठी ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गांधी चौकातून प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सर्व अंगणवाडी सेविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.