गोवारी समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:22 AM2018-10-21T00:22:15+5:302018-10-21T00:23:19+5:30
गोवारी ही जमात आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद आहे. मात्र चुकीने गोंडगोवारी बनविण्यात आले. शासकीय योजनांपासून दूर ठेवले आहे. मात्र, आता आम्हाला गोंडगोवारी नको तर गोवारी म्हणून नोंद करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोवारी ही जमात आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद आहे. मात्र चुकीने गोंडगोवारी बनविण्यात आले. शासकीय योजनांपासून दूर ठेवले आहे. मात्र, आता आम्हाला गोंडगोवारी नको तर गोवारी म्हणून नोंद करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी जिल्ह्यातील गोवारी समाजाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
अनुसूचित जमातीच्या यादीत १९५६ मध्ये गोवारी ही स्वतंत्र जमात म्हणून नोंद करण्यात आली आहे. यादी तयार करताना ‘गोवारी ’असा उल्लेख न करता गोंडगोवारी करण्यात आला. शासनाच्या चुकीमुळे या जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे. यासदंर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोंडगोवारी असे नमूद करून शासकीय सवलतींचा लाभ देण्याच निर्देश दिले होते. मात्र, शासनाने अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे गोवारी समाजाने लोकशाही मार्गाने लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीच्या पुढाकारातून दर्गा मैदानावरून मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.
जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने समाजाच्या मागणीची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी वासूदेव ठाकरे, व्ही. डी. शेंदरे, जीवन दुधकोहरे, अरूण राऊत, भास्कर राऊ त, नंदकिशोर दरवरे, हरिचंद्र नेवारे, सुधीर राऊ त, देवराव गजभे, देवेंद्र चामलोट, सुनिल सहारे आदींनी केली.