पदवीधर डी.एड. शिक्षकांनी संघटितपणे लढा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:26+5:302021-07-27T04:29:26+5:30
भद्रावती : पदवीधर डी.एड शिक्षकांवर ४० वर्षांपासून सतत अन्याय होत आहे. अन्याय दूर करण्याकरिता पदवीधर डी.एड. शिक्षकांनी संघटित ...
भद्रावती : पदवीधर डी.एड शिक्षकांवर ४० वर्षांपासून सतत अन्याय होत आहे. अन्याय दूर करण्याकरिता पदवीधर डी.एड. शिक्षकांनी संघटित होऊन लढा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष पद्मा तायडे यांनी राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाइन सभेत केले.
त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात बहुसंख्य शाळा खासगी व्यवस्थापनाकडून चालविल्या जातात. शाळांचे संचालन महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ नुसार करण्यात येते. प्राथमिक शाळा वर्ग एक ते चार किंवा एक ते सात तर माध्यमिक शाळा वर्ग पाच ते दहा किंवा पाच ते १२ चा समावेश आहे. शेड्युल ‘व’ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या अर्हताचा समावेश आहे. १९८१ च्या नियमावलीत पदवीधर शिक्षकांचा समावेश ‘क’ प्रवर्गात होत होता. डीप.टी. अभ्यासक्रम १९७९ मध्ये शासनाने बंद करून त्याचे नामाभिधान डी.एड. दोन वर्ष पाठ्यक्रम असे केले आहे. त्यामुळे पदवीधर डीएड शिक्षकांचा समावेश ‘क’ प्रवर्गात होतो, असे तायडे यांनी सांगितले.
सभेला महासंघाचे कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड, महासचिव बाळा आगलावे, उपाध्यक्ष बंडू धोटे, राजेंद्र मसराम, विश्वनाथ मशाडे, प्रवीण जाधव, कोषाध्यक्ष शहावन हुसेन, शाखेचे जिल्हाध्यक्ष देवीदास जांभुळे उपस्थित होते.