पदवीधर गुरुजींना मिळणार वेतनश्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:33+5:302021-03-07T04:25:33+5:30
शासनाने १३ ऑक्टोबर २०१६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांंना वेतनश्रेणी लागू करावी, अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या आहेत, अशी ...
शासनाने १३ ऑक्टोबर २०१६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांंना वेतनश्रेणी लागू करावी, अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षक व विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पदवीधर व विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी मिळावी, अशी शिक्षक भारती नागपूर विभागीय सचिव तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, विभागीय उपाध्यक्ष रवींद्र उरकुडे, जब्बार शेख, राजाराम घोडके, धनराज गेडाम, रावन शेरकुरे, दिवाकर लखमापुरे आदींची मागणी होती.