राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:27 AM2021-03-19T04:27:28+5:302021-03-19T04:27:28+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले होते. विशेष अतिथी म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या ...

Graduation Ceremony at Rashtrasant Tukdoji College | राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

Next

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले होते. विशेष अतिथी म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच नवनियुक्त सिनेट सदस्य डॉ. शुभांगी वडस्कर, गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव विनायकबापू कापसे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी डॉ. शुभांगी वडस्कर यांनी मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थांनी पदवी घेतल्यानंतर अवांतर ज्ञानामध्ये भर घालावी, नवनवीन कौशल्य आत्मसात करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थांनी न्यूनगंड बाळगू नये. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील यांनी प्रास्ताविकमधून सांगितले की, या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी गुणात्मकच नव्हे, तर स्पर्धेच्या विविध क्षेत्रात चमकत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा "यावे ज्ञानासाठी, जावे सेवेसाठी" हा वसा घेऊन जातात. विद्यार्थांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आव्हाने स्वीकारावी. आपल्या अध्यक्षीय भाषणात गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले म्हणाले की, केवळ भौतिक वास्तू म्हणजे महाविद्यालय नाही. जर विद्यार्थांनी गुणात्मक झेप घेऊन समाजोपयोगी कामात भर घालावी. विद्यार्थांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख विषद केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. टी. बन्सोड यांनी सूत्रसंचालन केले, तर आयक्युएसी समन्वयक प्रा. आशुतोष पोपटे यांनी आभार मानले.

Web Title: Graduation Ceremony at Rashtrasant Tukdoji College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.